Central government plan to build new 84 air ports in country  Dainik Gomantak
अर्थविश्व

देशात नवीन 84 विमानतळे, नागरी उड्डाण मंत्रायलयाचा मेगा प्लॅन

सरकारने येत्या 5 वर्षात देशातील विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे

दैनिक गोमन्तक

'उडे देश का आम नागरिक' (UDAN) या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेमुळे अलिकडच्या वर्षांत विमान सेवा (Airline Sector) आणि हवाई मार्गांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती देशाचे नागरी उड्डाण मंत्री (Minister of State for Civil Aviation) ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी सांगितले आहे. ओडिशाच्या झारसुगुडा येथे आयोजित 'उडान उत्सव' कार्यक्रमाला संबोधित करताना सिंधिया यांनी सोमवारी सांगितले की, स्वातंत्र्यापासून 2014 पर्यंत देशात फक्त 72 विमानतळ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली आज त्यांची संख्या 136 वर पोहोचली आहे.(Central government plan to build new 84 air ports in country)

येत्या 5 वर्षात देशातील विमानतळांची संख्या 220 पर्यंत नेण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे, असे ते म्हणाले. उडान योजनेमुळे विमानसेवा आणि हवाई मार्गांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. उडान योजनेंतर्गत शिलाँग आणि दिमापूर दरम्यानच्या नवीन हवाई सेवेलाही त्यांनी हिरवा झेंडा त्यांनी काल दाखवला.

आंतरराष्ट्रीय उड्डाणे सामान्य करण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाकडून गेल्या आठवड्यात सांगण्यात आले होते. तथापि, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांचे निलंबन 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवले ​​आहे. ही बंदी आधी ३१ ऑक्टोबरपर्यंत होती, ती वाढवण्यात आली आहे. तथापि, सक्षम प्राधिकार्‍याकडून प्रत्येक प्रकरणाच्या आधारावर निवडलेल्या मार्गांवर नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाऊ शकते असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.

दुसरीकडे, बेंगळुरू, कर्नाटक येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा 'रोसेनबॉअर टेक्निकल सिम्युलेटर' कार्यान्वित करणारे दक्षिण आशियातील पहिले विमानतळ ठरले आहे.बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने माहिती दिली की अशा प्रकारची उच्च-तंत्र उपकरणे बसवणारे बेंगळुरू विमानतळ हे दक्षिण आशियातील पहिले विमानतळ आहे. "रोसेनबॉअर टॅक्टिकल सिम्युलेटर सिस्टीम अग्निशमन दल आणि संरक्षण दलांसाठी आपत्कालीन तयारीसाठी अनेक पर्याय प्रदान करते, त्यात बेंगळुरू विमानतळाचा समावेश आहे," असे त्यात म्हटले आहे. या प्रणालीद्वारे अग्निशामकांना प्रत्यक्ष वातावरणात प्रशिक्षण देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT