PM Modi Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

8th Pay Commission Latest Update: होळीच्या मुहूर्तावर सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे.

Manish Jadhav

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. होळीच्या मुहूर्तावर सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या ताज्या आकडेवारीनुसार, ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू मानली जाईल.

सध्या कर्मचाऱ्यांना 58% दराने महागाई भत्ता मिळत असून तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यामध्ये 2% ची वाढ निश्चित मानली जात आहे. जर ही वाढ मंजूर झाली, तर महागाई भत्त्याचा आकडा 60% या ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचेल. काही अहवालांमध्ये 6% वाढीचा दावा केला जात असला तरी, गेल्या 12 महिन्यांची सरासरी पाहता 2% वाढ सर्वात वास्तववादी वाटत आहे.

या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या (Employees) हातात येणाऱ्या पगारावर होणार आहे. महागाई भत्ता हा मूळ वेतनावर मोजला जातो, त्यामुळे पगारामध्ये चांगली वाढ पाहायला मिळेल. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला असल्यामुळे आता सर्वांच्या नजरा आठव्या वेतन आयोगाकडे लागल्या आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये बदल झाल्यास किमान वेतन 18000 रुपयांवरुन थेट 30000 ते 50000 दरम्यान पोहोचू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

महागाई भत्ता 50% ओलांडल्यानंतर तो मूळ वेतनात विलीन केला जाईल, अशी चर्चा सुरुवातीला होती; मात्र अर्थ मंत्रालयाने अद्याप यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. तरीही, जेव्हा आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात येईल, तेव्हा महागाई भत्ता पुन्हा शून्य (Zero) केला जाईल आणि नवीन मूळ वेतन निश्चित केले जाईल. मार्चमधील ही संभाव्य घोषणा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी होळीची मोठी भेट ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT