FM Nirmala Sitharaman DainikGomantak
अर्थविश्व

Union Budget 2026: कॅन्सर अन् शुगरची औषधे होणार स्वस्त, सर्वसामान्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; औषध निर्मितीसाठी 10 हजार कोटींचा 'बूस्टर डोस'!

FM Nirmala Sitharaman: अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, आता देशात मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधांच्या किमती कमी होणार आहेत.

Manish Jadhav

Union Budget 2026 Healthcare Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग नवव्यांदा लोकसभेत आपला अर्थसंकल्प सादर करत आहेत. याचदरम्यान त्यांनी आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. या अर्थसंकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना मिळालेला मोठा दिलासा. अर्थमंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार, आता देशात मधुमेह आणि कॅन्सरवरील औषधांच्या किमती कमी होणार आहेत. यामुळे या आजारांवरील महागड्या उपचारांचा बोजा सर्वसामान्यांच्या खिशावर कमी पडणार आहे.

केवळ किमती कमी करणे एवढ्यावरच न थांबता, औषध निर्मिती क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने फार्मा सेक्टरमध्ये 10 हजार कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीची घोषणा केली आहे. औषधांच्या निर्मितीला गती देण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी ही मोठी आर्थिक रसद पुरवण्यात आली आहे.

या अर्थसंकल्पात 'बायो-फार्मा शक्ती' या एका नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांसाठी 10 हजार कोटी रुपयांच्या तरतुदीसह सुरु होणाऱ्या या योजनेचे मुख्य उद्दिष्ट भारताला जागतिक स्तरावर 'बायो-फार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब' म्हणून विकसित करणे हे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 12 वर्षांत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळेच आज आपण अशा मोठ्या गुंतवणुकीचे धाडस करु शकत आहोत, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे नमूद केले की, कठीण काळात आणि जागतिक अनिश्चिततेमध्येही केंद्र सरकारने आर्थिक शिस्त पाळली असून, महागाई नियंत्रणात ठेवण्यासोबतच देशाचा विकास दर सातत्याने वाढवला आहे.

आरोग्य क्षेत्रासोबतच या अर्थसंकल्पात देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा सुरक्षा, गरिबी निर्मूलन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. 'आत्मनिर्भरता' हे सूत्र समोर ठेवून महत्त्वाच्या गोष्टींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो.

देशातील आरोग्य सुविधांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला परवडणारे उपचार मिळावेत या उद्देशाने सरकारने औषध निर्मिती क्षेत्राला दिलेले हे 10 हजार कोटींचे पाठबळ गेमचेंजर ठरणार आहे. विशेषतः बायो-फार्मा क्षेत्रात भारत आता जगात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गरिबी निर्मूलनासाठी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी आगामी काळात गुंतवणुकीचा ओघ वाढवून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT