Share Market Dainik Gomantak
अर्थविश्व

BSE Sensex: सेन्सेक्सने पहिल्यांदाच गाठला 65 हजारांचा टप्पा, निफ्टीनेही रचला इतिहास

Ashutosh Masgaunde

BSE Sensex and Nifty50 touches all time High: शेअर बाजाराच्या सुरू असलेल्या दमदार कामगिरीच्या दरम्यान, आज मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने (बीएसई सेन्सेक्स) प्रथमच 65000 चा टप्पा ओलांडला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून याकडे एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

सेन्सेक्स प्रमाणेच निफ्टी (BSE निफ्टी) देखील 19331 चा सर्वकालीन उच्चांक गाठला. सध्या निफ्टी 118 अंकांच्या वाढीसह 19307 च्या पातळीवर आहे आणि सेन्सेक्स 433 अंकांच्या वाढीसह 65152 वर आहे.

जुलैच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनला निफ्टीने इतिहास रचला आणि 19246 च्या विक्रमी पातळीवर व्यवहार सुरू केला.

सेन्सेक्सचा पूर्वीचा सर्वकालीन उच्चांक (Sensex-Nifty all time high) 64050 आणि निफ्टी 19011 होता, जो 28 जून रोजी बनला होता.

आज सेन्सेक्सने 65231 हा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. निफ्टीने 19331 चे नवीन शिखर गाठले आहे.

महिन्याच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनला सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 421 अंकांच्या उसळीसह 65140 च्या पातळीवर होता, तर निफ्टी 119 अंकांच्या उसळीसह 19308 च्या पातळीवर होता.

असे मानले जाते की जर दोन्ही निर्देशांकांची गती अशीच राहिली तर आज बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी दिवसाच्या अखेरीस नवीन उडी घेऊन नवीन सर्वोच्च रेकॉर्डवर बंद होऊ शकतात.

आत्तापर्यंत बाजाराच्या स्थितीनुसार ५० निफ्टी समभागांपैकी ३१ हिरव्या तर १९ लाल चिन्हावर होते.

जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी, आयशर मोटर्स, एचडीएफसी बँक आणि ग्रासिम हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले, तर पॉवर ग्रिड, मारुती, सनफार्मा, यूपीएल आणि टेक महिंद्रा यांना सर्वाधिक नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

वेलिंगकरप्रकरणी 'लुकआऊट नोटीस' जारी! हिंदुत्ववादी संघटनांचे समर्थन; पोलिसांची पथके मागावर

'पोल्ट्री उद्योगाला' सरकारकडून पूर्ण सहकार्य देणार! युवकांनी उद्योग-व्यवसायात यावे असे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Rashi Bhavishya 6 October 2024: कष्टातून मिळणार समृद्धी,पार्टनरशिपमधून होणार सुखाची प्राप्ती; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Illegal Fishing: गोव्‍याच्‍या समुद्रात धुडगूस घालणारे ट्रॉलर्स जप्‍त! बेकायदा मासेमारीविरुद्ध मत्स्योद्योग खात्याची कारवाई

SCROLL FOR NEXT