Rishi Sunak & Akshata Murthy Dainik Gomantak
अर्थविश्व

Rishi Sunak यांचे इन्फोसिस कनेक्शन, अक्षता मूर्ती पुन्हा मालामाल

British Prime Minister Rishi Sunak: ऋषी सुनक हे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

British Prime Minister Rishi Sunak: ऋषी सुनक हे नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत. भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसशी त्यांचा थेट संबंध आहे. वास्तविक, ऋषी सुनक यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहेत. विशेष म्हणजे, अक्षता या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या आहेत. अक्षता मूर्ती यांचा इन्फोसिसमध्ये मोठा हिस्सा आहे.

दरम्यान, Infosys आर्थिक वर्ष 2022-23 साठी आपल्या भागधारकांना 16.50 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश देत आहे. कंपनीने अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख 28 ऑक्टोबर 2022 निश्चित केली आहे. याचा अर्थ रेकॉर्ड तारखेला इन्फोसिसचे शेअर्स धारण करणाऱ्या गुंतवणूकदारांना (Investors) अंतरिम लाभांश मिळेल.

अक्षता मूर्तीला लाभांश म्हणून 64.27 कोटी रुपये मिळतील

सप्टेंबर 2022 च्या तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, नवीन ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक (British Prime Minister Rishi Sunak) यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसमध्ये 3,89,57,096 शेअर्स आहेत. कंपनीत त्यांची हिस्सेदारी 1.07% आहे. सध्या इन्फोसिस प्रति शेअर 16.50 रुपये अंतरिम लाभांश देत आहे. त्यानुसार, अक्षता मूर्ती (Akshata Murthy) यांना इन्फोसिसकडून अंतरिम लाभांशाच्या रुपात 64,27,92,084 रुपये किंवा 64.27 कोटी रुपये मिळतील. अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांचे 2009 मध्ये लग्न झाले होते.

Infosys चे शेअर्स 5 वर्षात 225% वर चढले

आयटी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स गेल्या पाच वर्षांत 225 टक्क्यांनी वाढले आहेत. 3 नोव्हेंबर 2017 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 463.33 रुपये होते. 28 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बीएसईवर 1509.40 रुपयांवर बंद झाले.

दुसरीकडे, इन्फोसिसच्या समभागांनी स्थापनेपासून 158,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 22 मार्च 1996 रोजी कंपनीचे शेअर्स केवळ 96 पैशांच्या पातळीवर होते. मात्र, इन्फोसिसचे शेअर्स (Shares) या वर्षात आतापर्यंत सुमारे 21% घसरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT