SBI  Dainik Gomantak
अर्थविश्व

Banking Sector in India: आर्थिक मंदीच्या काळात भारतीय बँकांची विश्वासार्हता कायम, 'हा' किर्तीमान...

Manish Jadhav

Banking Sector in India: जगात एकीकडे रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे, तर दुसरीकडे अनेक देश आर्थिक मंदीचा सामना करत आहेत.

यातच, भारत आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. भारत या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या शर्यतीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय, इतर देशांच्या तुलनेत भारतात मंदीचा धोकाही नगण्य आहे.

दरम्यान, अमेरिका (America) हा जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. मात्र, आजच्या काळात अमेरिका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशातील अनेक बँका बुडाल्या आहेत.

सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. याशिवाय युरोपची क्रेडिट सुइस बँकही बुडाली. या बँका बुडल्याने पुन्हा एकदा जगात आर्थिक अस्थिरतेचा धोका वाढला आहे.

दुसरीकडे, जर भारताबद्दल बोलायचे झाल्यास, आपल्या देशात अशी कोणतीही समस्या समोर आलेली नाही. देशातील बँकिग व्यवस्था मजबूत स्थितीत दिसत आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढत आहे.

वर्षाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था चीनला (China) मागे टाकेल, असा विश्वास आहे. देशाची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहिली तर लवकरच भारत विकसित देश होईल.

कोरोनानंतर भारतालाही आर्थिक मंदीचा सामना करावा लागेल, असे मानले जात होते. जगातील अनेक देशांना मंदीचा सामना करावा लागला, पण भारतात तशी परिस्थिती नव्हती. एका अहवालानुसार यूके, अमेरिका, जर्मनी, जपान, चीनला मंदीचा सामना करावा लागू शकतो.

मात्र, भारताला अशा कोणत्याही मंदीचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग, भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास साधण्यात बँकांचे योगदान कसे आहे ते जाणून घेऊया?

भारतीय बँकांची कर्जवाढ वाढली

देशातील मध्यवर्ती बँक आरबीआयने एक आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारताची कर्जवाढ 14.6 टक्के होती. दुसरीकडे, 2011-12 मध्ये बँकांच्या कर्जाची वाढ 17 टक्के होती.

जर बँक ठेवींबद्दल बोलायचे झाल्यास, 2022-23 या आर्थिक वर्षात बँकांच्या ठेवींची वाढ 9.6 टक्के होती. भारतात निरंतर लोन ग्रोथ होत आहे.

आत्मनिर्भर भारत आणि होम लोन हे त्यामागचे कारण आहे. चला तर मग जाणून घेऊया या दोन घटकांचा कर्जवाढीवर कसा परिणाम होतो?

आत्मनिर्भर भारत

लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारे विविध योजना राबवत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण भागातून शहरांपर्यंत कर्जाची मागणी वाढत होत आहे. अशा प्रकारे देशातील एमएसएमई क्षेत्रालाही चालना मिळत आहे.

स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी लोक बँकांकडून कर्ज घेत आहेत. आजच्या काळात अनेक लोक स्टार्टअप सुरु करत आहेत. यामुळे सरकारला आत्मनिर्भर भारत विकसित करण्यास मदत होत आहे.

होम लोन

प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते. आजच्या काळात स्वतःच्या घरात राहणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. अशा स्थितीत घरांची मागणी वाढली आहे. असे मानले जाते की, कोविड-19 नंतर लोकांनी घराला खूप प्राधान्य दिले आहे.

अशा परिस्थितीत खेड्यांपासून शहरांपर्यंत गृहकर्जाची मागणी वाढली आहे. गृहकर्जांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण आणि शहरी) यांनी मोठे योगदान दिले आहे.

देशातील बँका मजबूत झाल्याचा फायदा सामान्य माणसाला होतो का?

भारतीय बँकांनी खंबीरपणे काम केले तर सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होतो. देशात कर्जाची मागणी वाढू लागली आहे. यासोबतच बँकेच्या FD व्याजदरातही वाढ होत आहे.

देशातील बँका अशाच भक्कम राहिल्या तर देशाची आर्थिक व्यवस्थाही मजबूत होईल. अशा रीतीने सर्वसामान्यांचा विकासही होत राहील.

एचडीएफसी बँक जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) नाव समाविष्ट झाले होते. मात्र, आता देशात तसेच जगात एचडीएफसी बँकेचे वर्चस्व दिसून येत आहे.

आज एचडीएफसी बँक जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचे गेल्या महिन्यात 1 जुलै 2023 रोजी विलीनीकरण झाले.

या विलीनीकरणामुळे एचडीएफसी देशातील सर्वात मोठी बँक बनली आहे. आता HDFC बँकेचे एम-कॅप $100 बिलियन पेक्षा जास्त आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT