फिनटेक क्रांती दरम्यान (fintech revolution), क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये चांगली तेजी दिसून येत आहे. पण दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Minister of Finance Nirmala Sitharaman) यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत (cryptocurrency) जगाला सतर्क केले आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ((International Monetary Fund-IMF) बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. फिनटेक ( (fintech) ) म्हणजे आर्थिक तंत्रज्ञान याच ( financial technology) तंत्रज्ञानाच्या मदतीने आर्थिक कार्य पूर्ण करणे म्हणजे फिनटेक. जेव्हा एखादी कंपनी असे काम करते तेव्हा तिला फिनटेक कंपनी म्हणतात.
या स्प्रिंग मीटिंग दरम्यान आयोजित एका चर्चासत्रासाठी,अर्थमंत्री निर्मला सीतारमन उपस्थित होत्या. क्रिप्टोकरन्सीचा सर्वात मोठा धोका हा मनी लाँड्रिंग आणि दहशतवादाला वित्तपुरवठा करण्यासाठी त्याचा वापर असू शकतो, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत सांगितले. मंत्री सीतारमण यांनी आईएमएफचे प्रबंध निदेशक क्रिस्टालिना जॉर्जीवा आयोजित "मनी एट ए क्रॉसरोड" या उच्च पातळीवरील पॅनेलमध्ये भाग घेतला. सीतारामन यांनी डिजिटल जगात भारताची कामगिरी आणि गेल्या दशकात डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. कोविड-19 महामारीच्या काळात भारतात डिजिटलचा वापर वाढण्यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले.
या बैठकांमध्ये भाग घेतला
जागतिक बँक, IMF, G20 आणि फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) यांच्या अधिकृत बैठकांव्यतिरिक्त, सोमवारी त्यांनी वॉशिंग्टन डीसी-आधारित थिंक टँक असलेल्या अटलांटिक कौन्सिलच्या कार्यक्रमातही भाग घेतला.
अर्थमंत्र्यांच्या दौऱ्यात इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर उच्चस्तरीय बैठक तसेच जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांच्याशी उच्चस्तरीय बैठकीसह अनेक द्विपक्षीय चर्चासंत्रांचा समावेश असेल, असे वित्त मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे वॉशिंग्टनमध्ये बैठक संपल्यानंतर, सीतारामन 24 एप्रिल रोजी सॅन फ्रान्सिस्कोला जातील, जिथे त्या व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधतील आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. 27 एप्रिलला त्या भारतासाठी रवाना होणार आहेत.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय
एक क्रिप्टोकरन्सी, क्रिप्टो-चलन, क्रिप्टो किंवा नाणे (A cryptocurrency, crypto-currency, crypto or coin) हे डिजिटल चलन आहे. हे संगणक नेटवर्कद्वारे देवाणघेवाण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. ज्याद्वारे पैशांची डिजिटल पद्धतीने देवाणघेवाण होते. जे सध्या एक्सचेंजसाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.