SBI-PNB-ICICI-HDFC Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Account Minimum Balance: SBI-HDFC-ICICI बँकेसाठी मोठी बातमी, दंड टाळण्यासाठी आजच करा 'हे' काम

Minimum Balance Rule: जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC (HDFC) किंवा ICICI बँक (ICICI Bank) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Manish Jadhav

Minimum Balance Rule: जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC (HDFC) किंवा ICICI बँक (ICICI Bank) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांकडून खाते उघडताना अनेक मोठ्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. पण या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियमांबाबत सतर्क राहणे गरजेचे असते.

नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यासाठी एक दिवस बाकी आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला बँकांचा मिनिमम एवरेज बॅलन्सचा नियम माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरुन नवीन वर्षात तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंडाला सामोरे जावे लागणार नाही.

निर्धारित मर्यादेनुसार पैसे ठेवणे आवश्यक आहे

तुमचे कोणत्याही बँकेत (Bank) खाते असल्यास, खात्यात मिनिमम एवरेज बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. मिनिमम एवरेज बॅलन्स अंतर्गत, तुम्हाला बँकेने खात्यात निश्चित केलेली रक्कम ठेवावी लागेल.

जर तुम्ही बॅलन्स ठेवू शकत नसाल तर बँकेकडून दंड आकारला जातो. प्रत्येक बँक सरासरी लिमिट ठरवते, ग्राहकाला नेहमी त्या मर्यादेपर्यंत खात्यात पैसे ठेवणे आवश्यक असते.

काही बँकांची मर्यादा समान आहे

बँकांचा स्वतःचा एवरेज मिनिमम बॅलन्स निश्चित असतो. तथापि, काही बँकांची लिमिट एक सारखी आहे तर काहींची लिमिट त्यापेक्षा भिन्न आहे.

आज आम्ही तुम्हाला देशातील दिग्गज बँक एसबीआय, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँक यांच्या मिनिमम बॅलन्सबद्दल सांगणार आहोत.

SBI मध्ये किती शिल्लक आवश्यक आहे?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बचत खात्यात ठेवला जाणारा मिनिमम बॅलन्स तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून असतो. SBI खात्यातील किमान मर्यादा शहरानुसार रु. 1,000 ते रु. 3,000 पर्यंत असते.

ग्रामीण भागासाठी, ते 1,000 रुपये आहे, जर तुमचे निमशहरी भागातील शाखेत खाते असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय, मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये आहे.

HDFC च्या खात्यातील सरासरी किमान शिल्लक

HDFC मधील सरासरी मिनिमम बॅलन्स लिमिट तुमच्या रेज‍िडेन्सीवर अवलंबून असते. शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये आहे. त्याचवेळी, निमशहरी भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपयांची मर्यादा आहे.

ICICI बँक मर्यादा

एचडीएफसी बँकेप्रमाणेच आयसीआयसीआय बँक खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवला पाहिजे. येथे शहरी भागातील खातेदारासाठी 10,000 रुपये, निमशहरीसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये लिमिट राखणे आवश्यक आहे.

काही विशेष, बँक खात्यांमध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम लागू होत नाही. या प्रकारच्या बँक खात्यामध्ये प्रधानमंत्री जन धन योजना, मूलभूत बचत बँक ठेव खाते, निवृत्तीवेतनधारकांचे बचत खाते, वेतन खाते यांच्याशी संबंधित खाती समाविष्ट आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT