SBI च्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, बँक देतेय 40,000 चा पूर्ण लाभ; खात्यात लगेच येणार पैसे!

SBI ग्राहकांना आता 40,088 रुपयांचा थेट लाभ मिळत आहे, परंतु तुम्ही हा लाभ 31 मार्चपर्यंतच घेऊ शकता.
SBI
SBI Dainik Gomantak
Published on
Updated on

SBI Bank मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुमचेही देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत खाते असेल, तर SBI ग्राहकांना आता 40,088 रुपयांचा थेट लाभ मिळत आहे, परंतु तुम्ही हा लाभ 31 मार्चपर्यंतच घेऊ शकता.

दरम्यान, SBI 400 दिवसांच्या FD वर 7.1 टक्के दराचा लाभ देत आहे. यासह, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 25 बेसिस प्वाइंटची वाढ झाली आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला 40,088 रुपयांचा फायदा कसा मिळेल ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

SBI
SBI-PNB-ICICI-HDFC सह सर्व बँकांनी दिली आनंदाची बातमी, करोडो ग्राहकांची चांदी!

तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या विशेष योजनेवरील व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही 5 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीनंतर 5,40,088 रुपये मिळतील.

यामध्ये तुम्हाला 40,088 रुपये व्याज मिळतील. हे तुमचे निश्चित उत्पन्न आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतून हा लाभ घेऊ शकता.

दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या योजनेचा तुम्ही 31 मार्चपर्यंत लाभ घेऊ शकता. तुम्ही अद्याप या योजनेत गुंतवणूक (Investment) केली नसेल, तर ती संपण्यापूर्वी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करुन त्याचा लाभ घेऊ शकता.

SBI
SBI Online: एसबीआयच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, 17 मार्चपासून होणार 'हा' बदल

याशिवाय, जर आपण 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींबद्दल बोललो तर बँकेने (Bank) यावर 25 बेसिस पॉइंट्स वाढवले ​​आहेत. SBI च्या पहिल्या 1 वर्षाच्या मॅच्युरिटी FD वर 6.75% लाभ मिळत आहे.

आता यामध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यानंतर 6.80 टक्के नफा मिळत आहे. त्याचवेळी, पूर्वी 2 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज मिळत होते आणि आता 7 टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.

SBI
SBI खातेदारांचे बल्ले-बल्ले, तुम्हालाही मुलगी असेल तर बॅंक देणार 15 लाख रुपये!

जर 3 वर्षांच्या मुदतीच्या FD बद्दल बोलायचे झाल्यास, आधी 6.25 टक्के दराने लाभ मिळत होता, तर आता 6.50 टक्के व्याजाचा लाभ मिळेल. त्याचवेळी, पूर्वीच्या 6.25 टक्क्यांऐवजी आता 5 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळत आहे. बँकेचे नवे दर 15 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com