LPG cylinder  Dainik Gomantak
अर्थविश्व

New Rules From December 1: Railway-LPG पासून बँकेच्या नियमांपर्यंत 5 महत्त्वाचे नियम आजपासून बदलले

Changes From 1st December: आजपासून कार खरेदी करणे तुमच्यासाठी महाग झाले आहे. 1 डिसेंबरपासून झालेल्या बदलामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्सशी संबंधित शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Changes From 1st December: दर महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे या वेळीही 1 डिसेंबरपासून बरेच बदल झाले आहेत. यातील काही बदल तुम्हाला फायदेशीर ठरतील तर काही तुमच्या खिशाला भारी पडतील. आजपासून कार खरेदी करणे तुमच्यासाठी महाग झाले आहे. 1 डिसेंबरपासून झालेल्या बदलामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्सशी संबंधित शुल्कात वाढ करण्यात आली आहे. मात्र, विमा शुल्कात किरकोळ वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, 1 डिसेंबरपासून पीएनबीच्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठा बदल लागू झाला आहे. आजपासून पीएनबीचे (PNB) ग्राहक पूर्वीप्रमाणे एटीएममधून पैसे काढू शकणार नाहीत. मशीनमध्ये कार्ड टाकल्यानंतर, नोंदणीकृत क्रमांकावर एक ओटीपी प्राप्त होईल. नोंदणी केल्यानंतरच तुम्ही पैसे काढू शकाल.

तसेच, एलपीजीसोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींचा दर महिन्याच्या पहिल्या दिवशी आढावा घेतला जातो. गेल्या पाच महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले आहेत. यावेळी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय एटीएफच्या किमतीतही बदल होऊ शकतो.

दुसरीकडे, पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे. त्यात अद्याप कोणताही बदल जाहीर करण्यात आलेला नाही. तारखेत कोणताही बदल न झाल्यास, आता तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करु शकणार नाही. प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमचे पेन्शन थांबवले जाऊ शकते. डिसेंबरमध्ये धुक्याचा वाढता प्रकोप पाहता रेल्वेकडून अनेक बदल करण्यात आले आहेत. याअंतर्गत दरवर्षी अनेक गाड्यांच्या वेळा बदलल्या जातात. रेल्वेने 1 डिसेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत सुमारे 50 गाड्या रद्द केल्या आहेत.

शिवाय, आरबीआयने (RBI) जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीमध्ये डिसेंबरमध्ये 14 दिवस आहेत, ज्यामध्ये बँका काम करु शकणार नाहीत. या 14 दिवसांमध्ये दुसरा-चौथा शनिवार, रविवार याशिवाय सणासुदीचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Milk Import: गोव्याची दूधाची तहान भागेना! रोज 2.60 लाख लिटर दुधाची आयात; 'कामधेनू' योजनेत सुधारणा करण्याची शेतकऱ्यांची मागणी

Goa Labour Report: गोव्यात रोजंदारीवरील कामगारांच्या संख्येत मोठी घट! 10 वर्षांत 40 हजार कामगार कमी झाले; कारखाने आणि बाष्पक खात्याच्या नोंदीतून उघड

New Labour Law: कामगारांना समान वेतन, डिजिटल पेमेंट! केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांची गोव्यात अंमलबजावणी होणार; मुख्यमंत्री सावंतांची घोषणा

Goa ZP Election: युती झाली, पण जागावाटप थांबले! झेडपी निवडणुकीत 'काँग्रेस-फॉरवर्ड-आरजीपी' एकत्र; आरक्षणाच्या निवाड्याकडे तिन्ही पक्षांचे लक्ष

South Goa ZP Reservation: ओबीसी 'ट्रिपल टेस्ट' आणि एससी आरक्षणाचा पेच! झेडपी निवडणुकीच्या भवितव्याचा निर्णय आता न्यायालयाच्या हाती

SCROLL FOR NEXT