State Bank Of India  Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI मध्ये खाते असणाऱ्यासाठी मोठा अलर्ट

SBI देशातील सर्वात मोठी सरकारी बँकने आपल्या ग्राहकांसाठी नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमन्तक

SBI ने काढलेल्या नोटिसमध्ये (Notice)ग्राहकांना त्यांचे आधार कार्ड आणि पॅनकार्डला लिंक करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने ग्राहकांसाठी नोटीस काढली आहे की, आधार कार्ड आणि पॅन कार्ड (पॅन) लिंक करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. याचाच अर्थ 30 सप्टेंबरपूर्वीच आधारकार्ड पॅन कार्ड लिंक करा.

SBI ने पुढे नोटीस मध्ये सांगितले, जर ग्राहकांनी हे केले नाही तर ते बँकिंग सेवेचा वापर करू शकणार नाहीत.

पॅनला (PAN) आधारशी जोडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. जर खातेधारक निर्धारित वेळेत पॅनशी आधार लिंक केले गेले नाही तर खातेधारकाचे पॅन कार्ड बंद होईल. आयकर विभागाने पॅन कार्डला आधारशी जोडणे याआधीच अनिवार्य केले आहे. सीबीडीटी पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची शेवटची तारीख आधी 30 जून होती. पण नंतर ती वाढवण्यात आली.

जर खातेधारकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर त्यांना कलम 234H (ACT 234H)अंतर्गत जास्तीत जास्त 1,000 रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. त्यामुळे एसबीआय सर्वच बँका आपल्या ग्राहकांना पॅनशी आधार लिंक करण्याचा सल्ला देत आहेत.

तुम्ही SMS द्वारे तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या SMS बॉक्समध्ये UIDPN कॅपिटल लेटरमध्ये टाईप करावे लागेल. यानंतर स्पेस देऊन तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाईप करा आणि नंतर स्पेस देऊन 10 अंकी पॅन नंबर टाका. हा एसएमएस 567678 किंवा 56161 वर पाठवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT