Fake Call Scam Dainik Gomantak
अर्थविश्व

Fake Call Scam: यू आर अंडर अरेस्ट... तुम्हालाही असे कॉल आलेत का? वेळीच व्हा सावध; SBI कडून अलर्ट जारी

Scam Alert SBI: तुम्हाला कधी असे कॉल आलेत का ज्यात कॉल करणारा तुम्हाला 'यू आर अंडर अरेस्ट…'? असे म्हणतो. जर हो असेल, तर ही बातमी नक्की वाचा.

Manish Jadhav

SBI Scam Warning: तुम्हाला कधी असे कॉल आलेत का ज्यात कॉल करणारा तुम्हाला 'यू आर अंडर अरेस्ट…'? असे म्हणतो. जर हो असेल, तर ही बातमी नक्की वाचा. खरेतर, आजकाल अनेक प्रकारचे स्कॅम समोर येत आहेत. अशाप्रकारचा कॉल देखील एक प्रकारचा स्कॅम कॉल आहे, ज्याबद्दल एसबीआयने इशारा दिला आहे. चला तर मग काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेऊया...

काय आहे प्रकरण?

दरम्यान, फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये अटक (Arrested) आणि वॉरंट वाले स्कॅम कॉल देखील वेगाने वाढत आहेत. ही अशी प्रकरण आहेत जेव्हा एखादा स्कॅमर तुम्हाला बँक अधिकारी, सीबीआय अधिकारी किंवा आयकर विभागाचा अधिकारी म्हणून कॉल करुन तुमची फसवणूक करतो. हे स्कॅमर तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करतात, प्रोफेशनल अधिकाऱ्यांसारखे बोलतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकता तेव्हा ते तुमची फसवणूक करतात. यादरम्यान तुम्हाला काहीही समजायच्या आत तुमचे बॅंक अकाऊंट रिकामे होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अलर्ट

अशा स्कॅमबाबत स्टेट बँक ऑफ इंडियानेही आपल्या ग्राहकांना इशारा दिला आहे. बँकेने ग्राहकांना (Customer) नव्या फसवणूक मॉड्यूलबद्दल इशारा दिला आहे. एसबीआयने म्हटले की, स्कॅमर सीबीआय किंवा आयकर अधिकारी असल्याचे भासवून ग्राहकांना धमकावू शकतात आणि बनावट कायदेशीर कारवाईची धमकी देखील देऊ शकतात. बँकेने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

ते फसवणूक कशी करतात?

स्कॅमर पहिल्यांदा ग्राहकांना कॉल करतात आणि संभाषणादरम्यान त्यांची सर्व आवश्यक माहिती मिळवतात. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी स्कॅमर त्यांना ते आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगतात आणि त्यांच्याकडून काही वैयक्तिक माहिती मागतात. स्कॅमर विशेषतः ग्राहकांकडे केवायसी नंबर, पत्ता, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यासारखे तपशील मागतात.

याशिवाय, स्कॅमर ग्राहकांच्या फॅमिलीची माहिती मिळवतात आणि त्यांच्या नावाने कॉल करतात की त्यांची UPI सेवा योग्यरित्या काम करत नाही आणि ते पैसे पाठवत आहेत, परंतु प्रत्यक्षात ते ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी टॅक्स संबंधित माहिती पाठवा. एवढचं नाहीतर स्कॅमर असा देखील दावा करु शकतात की, तुम्ही अलीकडेच अशी मालमत्ता विकली आहे, ज्यावर टॅक्स लागू आहे आणि तुम्ही तो भरलेला नाही. ही माहिती स्कॅमरला प्रॉपर्टी वेबसाइट, प्रॉपर्टी ब्रोकरच्या वेबसाइट किंवा प्रॉपर्टी रजिस्ट्रार ऑफिसमधून सहज मिळू शकते.

जेव्हा ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकतात तेव्हा स्कॅमर त्यांना सांगतात की, जर त्यांनी त्यांना लाच दिली तर प्रकरण मिटवले जाईल. मग ते ग्राहकांना चौकशी सुरु होईपर्यंत वेगवेगळ्या बँक अकांऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पैसे परत ट्रान्सफर केले जातील असे सांगतात.

अशा स्कॅमपासून स्वत:चा बचाव कसा करायचा?

  • कॉल करणाऱ्या किंवा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव नेहमी शोधा. अनोळखी कॉल्सना एंटरटेन करु नका.

  • कोणताही बँक, सीबीआय किंवा आयकर अधिकारी तुम्हाला कॉल, एसएमएस किंवा व्हिडिओ कॉलद्वारे प्रायव्हेट माहिती विचारत नाही.

  • जर कोणी तुम्हाला कायदेशीर कारवाई किंवा दंडाची धमकी देत ​​असेल तर सावधगिरी बाळगा.

  • कोणतेही संशयास्पद कॉल किंवा मेसेजसंबंधी तुमच्या बँक आणि स्थानिक अधिकाऱ्यांना कळवा.

  • कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करु नका किंवा तुमची पर्सनल माहिती शेअर करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT