बँकांच्या खाजगीकरणाला विरोध होत असून, याच पर्वात बँक संघटनांनी 28 आणि 29 मार्चला दोन दिवसांचा संप जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही काही कामासाठी सोमवार आणि मंगळवारी बँकेत पोहोचलात तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण बँकांमधील संपामुळे कामकाज बंद राहणार आहे. (Banks strike for two days from today, possibility of no cash in ATMs)
देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) या संपाचा परिणाम कामकाजावर होणार असल्याचे म्हटले आहे. या संपात सर्व बँकांचे कर्मचारी सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एटीएम सेवेवरही परिणाम होऊ शकतो. तथापि, या कालावधीत ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे एसबीआयने निवेदन जारी केले आहे. बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे. (Banks strike News)
सलग 4 दिवस बँकेतील (Bank) सेवेवर परिणाम, 26 मार्चला चौथा शनिवार आणि 27 मार्चला रविवार असल्याने बँकांना सुट्टी आहे. अशा प्रकारे सलग 4 दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे कामात व्यत्यय येणं साहजिक आहे. मात्र, या काळात नेटबँकिंग आणि एटीएम सेवा उपलब्ध असेल. मात्र बँक सतत बंद राहिल्याने एटीएममध्येही (ATM) रोकड तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने IDBI बँकेसह दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली आहे. सरकारने गेल्या अर्थसंकल्पातच ही घोषणा केल्यापासून बँक संघटना खासगीकरणाला विरोध करत आहेत. सरकारने बँकांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी मागणी संघटना करत आहेत. याशिवाय इतरही अनेक मागण्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.