Nirmala Sitharaman: Dainik Gomantak
अर्थविश्व

SBI, HDFC अन् ICICI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Banking System: बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी.

दैनिक गोमन्तक

Banking System India: बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी. जर तुम्ही देखील बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला कर्ज घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकिंग व्यवस्थेसाठी काही विशेष सूचना केल्या आहेत.

दरम्यान, ग्राहकांच्या सोयीनुसार, बँकिंग व्यवस्था अधिक सोपी करण्याचे आदेश अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले आहेत. जेणेकरुन ग्राहक अधिकाधिक बँकेशी जोडले जातील. वास्तविक, बँकांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी, ते आवश्यक आहे.

अर्थमंत्र्यांनी सूचना केल्या

अर्थमंत्र्यांनी बँकांना सुचवले की, ग्राहकांना कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. खरे तर काही दिवसांपूर्वी उद्योग प्रतिनिधी आणि अर्थमंत्री यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही सूचना करण्यात आली होती. या बैठकीत अर्थमंत्र्यांनी बँकांना ग्राहकांना अंशत: सुविधा देण्याच्या बाबीची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. याचा फायदा SBI, HDFC, ICICI सह सर्व बँकांच्या ग्राहकांना होणार आहे. दुसरीकडे, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, स्टार्टअपची चिंता अधिक इक्विटीबद्दल आहे.

ग्राहकांची सोय आवश्यक आहे

अर्थमंत्री सितारामन पुढे म्हणाल्या की, 'बँकांनी अधिकाधिक ग्राहक अनुकूल बनण्याची गरज आहे. परंतु प्रतिकूल जोखीम घेण्याइतपत ते नसावे. तुम्ही ग्राहकांची सोय लक्षात घेऊन अधिकाधिक मैत्रीपूर्ण वागणे आवश्यक आहे. यावर दिनेश खारा म्हणाले की, 'ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेत डिजिटलायझेशनची प्रक्रिया वाढत आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंग संबंधित समस्यांपासून दिलासा मिळणार आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT