PM Kisan Yojana  Dainik Gomantak
अर्थविश्व

PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे? मग असं करा ऑनलाइन रजिस्ट्रेशन...

PM Kisan Yojana: आजच्या काळात करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत आहे. मागील महिन्यात या योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.

Manish Jadhav

PM Kisan Yojana: आजच्या काळात करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत आहे. मागील महिन्यात या योजनेचा 14 वा हप्ता जारी करण्यात आला आहे.

ही योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ मिळतो. ही रक्कम शेतकऱ्यांना हप्त्याद्वारे दिली जाते.

शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही धावपळ करावी लागणार नाही.

दरम्यान, सरकारने (Government) पीएम किसानच्या 15व्या हप्त्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल. चला तर मग, पंतप्रधान किसान योजनेसाठी नोंदणी कशी करायची ते जाणून घेऊया?

नोंदणी कशी करावी

- सर्वप्रथम, तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर (pmkisan.gov.in) जावे लागेल.

- येथे तुम्हाला फॉर्मर कॉर्नरचा पर्याय निवडावा लागेल.

- यानंतर तुम्हाला New Former च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

- आता तुम्ही Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration यापैकी कोणताही एक पर्याय निवडा.

- यानंतर तुम्ही आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि राज्य निवडा. यानंतर तुम्हाला Get OTP चा पर्याय निवडावा लागेल.

- तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP एंटर केल्यानंतर तुम्हाला Process for Registration वर क्लिक करावे लागेल.

- यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी माहिती भरावी लागेल. आता तुम्ही आधार ऑथेंटिकेशनसाठी पुढे जाऊ शकता.

- आता तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि सेव्ह बटणावर क्लिक करावे लागेल.

- तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होताच त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येईल.

पीएम किसानसाठी कुठे संपर्क साधावा

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी किंवा तक्रारीसाठी तुम्ही ई-मेल किंवा आयडीवर संपर्क साधू शकता. पीएम किसानचा अधिकृत ई-मेल आयडी pmkisan-ict@gov.in वर मेल केला जाऊ शकतो.

यासोबतच, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकावरही संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसानच्या हेल्पलाइन नंबर 1800115526 (टोल फ्री) आणि 011-23381092 वर कॉल करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

Goa Crime: तब्बल दोन वर्षांनी होणार 'त्या' महिलेवर मडगावात अंत्यसंस्कार; पोलीस बंदोबस्तात अंतिम विधी, वाचा नेमकं प्रकरण काय?

IND vs AUS ODI: कांगारुंच्या भूमीवर 'हिटमॅन' किंग! कसा आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हेड-टू-हेड रेकॉर्ड? रोहित-विराट गाजवणार पर्थचं मैदान

PM Modi Srisailam Visit: आंध्रात शिवरायांसमोर पंतप्रधान मोदी नतमस्तक; श्रीशैलम येथे श्री शिवाजी ध्यान मंदिर अन् शिवाजी दरबार हॉलला दिली भेट पाहा Photo

अ‍ॅलन-रविरा गोव्यात विवाहबद्ध! 'दिया और बाती हम' फेम अभिनेत्याने गर्लफ्रेन्डसोबत बांधली लग्नगाठ; पाहा Photos

SCROLL FOR NEXT