banking fraud qr code scam tips to prevent Dainik Gomantak
अर्थविश्व

कोणत्याही बँकेत असूद्या खाते 'ही' सावधगिरी बाळगाचं

बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

प्रधानमंत्री जन-धन योजना लागू झाल्यानंतर, भारतात आर्थिक समावेशात झपाट्याने वाढ झाली. यामुळे, जे लोक आतापर्यंत बँकिंग सेवेपासून दूर होते त्यांच्यासाठी बँक खाती देखील उघडण्यात आली. योजना सुरू झाल्यानंतर केवळ 4 वर्षांनी, देशातील 80 टक्क्यांहून अधिक लोकांनी बँक खाते सुरू केली. दुसरीकडे, नोटाबंदी आणि कोरोना महामारीमुळे डिजिटायझेशनही तीव्र झाले. मात्र, यासोबतच बँकिंग (Bank) फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.

देशातील सर्वात मोठी बँक SBI ने फसवणुकीच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सर्व खातेदारांना गुरुवारी सावध केले. एसबीआयने आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत लोकांना आर्थिक बाबींमध्ये शिक्षित करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत एसबीआयने गुरुवारी ट्विट केले की, 'क्यूआर कोड स्कॅन करा आणि पैसे मिळवा? हा चुकीचा मेसेज आहे. QR कोड घोटाळ्यापासून सावध रहा. स्कॅन करण्यापूर्वी विचार करा, अज्ञात आणि असत्यापित QR कोड स्कॅन करू नका. सावध रहा आणि सुरक्षित रहा.

या ट्विटसोबत SBI ने एक छोटा इन्फोग्राफिक्स व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करण्याची प्रक्रिया दाखवणाऱ्या व्हिडिओ दिला आहे.

'स्कॅन आणि स्कॅम? कधीही अज्ञात QR कोड स्कॅन करू नका किंवा UPI पिन टाकू नका. याच्या एक दिवस आधी, SBI ने अशीच एक पोस्ट टाकली होती, जी ग्राहकांना फसवणुकीच्या पद्धतींबद्दल माहिती देते आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग देखील सांगते. एसबीआयच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.

cybercrime.gov.in वर सायबर गुन्ह्यांची तक्रार करा. फोन, मेसेज किंवा ईमेलद्वारे केवायसी अपडेट्ससाठी फसव्या ऑफर्सपासून सावध रहा. मजबूत पासवर्ड ठेवा आणि तो नियमितपणे बदला. संपर्क तपशीलांसाठी SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्याचप्रमाणे, सर्वात मोठ्या बँकेने देखील सांगितले आहे की फसवणूक टाळण्यासाठी लोकांनी काय करावे. बँकेने सांगितले की, कोणतीही वैयक्तिक किंवा खात्याशी संबंधित माहिती कधीही कोणाशीही शेअर करू नका. अंदाज लावणे सोपे जाईल असा पासवर्ड ठेवू नका. एटीएम कार्ड क्रमांक, पिन, यूपीआय पिन, इंटरनेट बँक इत्यादींशी संबंधित माहिती अशा कोणत्याही ठिकाणी लिहू नका, ज्यात फसवणूक करणारे प्रवेश करू शकतात. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती शेअर करू नका. संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका आणि असे अॅप्स डाउनलोड करणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT