Bank Transaction Rules  Dainik Gomantak
अर्थविश्व

बँकेचे आर्थिक व्यवहाराचे नियम बदलले! 26 मे पासून नवीन नियम लागू

Bank Transaction Rules :सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की एका आर्थिक वर्षात बँकांशी मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅन क्रमांक किंवा आधारचे बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य असेल.

दैनिक गोमन्तक

Bank Transaction Rules : चालू खाती उघडण्यासाठी तसेच एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवी किंवा पैसे काढण्यासाठी सरकारने आधार किंवा स्थायी खाते क्रमांक (PAN) अनिवार्य केले आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने म्हटले आहे की एका आर्थिक वर्षात बँकांशी मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी पॅन क्रमांक किंवा आधारचे बायोमेट्रिक पडताळणी करणे अनिवार्य असेल. याशिवाय, कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडण्यासाठी देखील आवश्यक असेल. (Bank transaction rules changed)

CBDT ने आयकर नियम, 2022 अंतर्गत नवीन नियम तयार केले आहेत. ही अधिसूचना 10 मे 2022 रोजी जारी करण्यात आली आहे. हे नवीन नियम 26 मे पासून ग्राहकांना लागू होतील.

AKM ग्लोबलचे कर भागीदार संदीप सहगल यांनी आशा व्यक्त केली की या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येईल, कारण बँका, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थांना एका आर्थिक वर्षात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांची तक्रार करणे अनिवार्य होईल.

"यामुळे सरकारला आर्थिक व्यवस्थेतील रोख रकमेच्या हालचालींचा मागोवा घेण्यास मदत होईल," सेहगल म्हणाले. यामुळे संशयास्पद रोख ठेवी आणि पैसे काढण्याशी संबंधित प्रक्रिया अधिक कठोर होईल.

आयकर विभागाशी संबंधित सर्व कामांसाठी पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या रोख रकमेच्या व्यवहाराच्या वेळी, जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन नसेल तर तो आधार वापरू शकतो.

काय नियम आहेत ?

नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पॅन माहिती देणे आवश्यक असेल परंतु त्याच्याकडे पॅन नसेल तर तो आधार बायोमेट्रिक ओळख देऊ शकतो.

नांगिया अँड कंपनीचे भागीदार शैलेश कुमार म्हणाले की, व्यवहाराच्या वेळी पॅन क्रमांक दिला की, कर अधिकाऱ्यांना व्यवहाराचा मागोवा घेणे सोपे होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार थेट 69,000 रूपये होणार? 8व्या वेतन आयोगासमोर 3.833 फिटमेंट फॅक्टरची मागणी

CJP Protest Delhi: आंदोलकांवरील निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाची पोलिसांना चपराक! रस्ते, मेट्रो आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचे आदेश; प्रशासनाचे दणाणले धाबे

Stray Dogs Beach: समुद्रकिनाऱ्यांवरील भटक्या कुत्र्यांची दहशत मोडून काढणार! पर्यटन खात्याचा 15 ऑक्टोबरचा अल्टीमेटम!

VIDEO: चौकाराच्या गैरसमजात तिलक वर्माने गमावली विकेट! पिचवरच थांबला अन् झाला रनआऊट, विंडीजच्या खेळाडूंना हसू आवरेना; गंभीर भडकला

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पणजीत रणकंदन; आझाद मैदानावर आंदोलक आणि पोलिसांत जोरदार धुमश्‍चक्री!

SCROLL FOR NEXT