Bank  Dainik Gomanatak
अर्थविश्व

Bank MCLR Rates: 'या' बँकाकडून कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का, जास्त भरावा लागणार EMI

MCLR Latest Rates: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने MCLR चे दर वाढवले ​​आहेत.

Manish Jadhav

Bank MCLR Rates: बँकेकडून कर्ज घेतलेल्यांना मोठा धक्का बसला आहे. तुम्ही देखील कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल, तर आता तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने MCLR चे दर वाढवले ​​आहेत. त्याचबरोबर स्टेट बँकेने कर्जासह ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे.

RBI ने रेपो दरात वाढ केली होती

रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकतेच रेपो दरात वाढ केली आहे. RBI ने 8 फेब्रुवारी रोजी पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 0.25 टक्क्यांनी वाढवला आहे, त्यानंतर ग्राहकांच्या कर्जाचा EMI देखील वाढला आहे.

बँक ऑफ बडोदाने व्याजदरात वाढ केली

बँक ऑफ बडोदाने (Bank Of Baroda) सर्व कालावधीसाठी MCLR 0.05 टक्क्यांनी वाढवला आहे. बँकेचे नवीन दर 12 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, एका वर्षासाठी MCLR 8.5 टक्क्यांवरुन 8.55 टक्के करण्यात आला आहे. याशिवाय, एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.3 टक्के असेल.

परदेशातही भारतीयांची संख्या वाढली

याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने सर्व मुदतीच्या कर्जासाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवला आहे. या वाढीसह, एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR 8.30 टक्क्यांवरुन 8.45 टक्के करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, एक महिना, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून अनुक्रमे 7.9 टक्के, 8.2 टक्के आणि 8.35 टक्के करण्यात आला आहे. त्याचवेळी, एक दिवस, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढला आहे.

एसबीआयनेही वाढ केली

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियाने MCLR च्या व्याजदरात 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. या अंतर्गत, एक दिवस आणि तीन वर्षांच्या कर्जावरील MCLR आधारित व्याज 7.95 टक्के ते 8.70 टक्के असेल. नवीन दर 15 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेनेही ठेवींच्या दरात 0.05 टक्क्यांनी वाढ करुन 0.25 टक्के केली आहे.

सुधारित दरानुसार ज्येष्ठ नागरिकांना आता पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवर 8.5 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचवेळी, इतरांना तीन वर्षांच्या ठेवींवर 0.05 टक्के अधिक व्याज मिळेल. दीर्घ मुदतीच्या ठेवींवर आता 0.25 टक्के व्याज मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT