Cyber ​​Attack Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Bank Of Baroda Data Leak 1tb Dark Web: देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या सिस्टीममध्ये मोठा सायबर दरोडा पडल्याचा दावा एका हॅकरने केला असून तब्बल 1 टेराबाइट संवेदनशील डेटा डार्क वेबवर मोफत प्रसिद्ध करण्यात आला.

Manish Jadhav

Bank Of Baroda Data Leak 1tb Dark Web: भारतीय बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या सिस्टीममध्ये मोठा सायबर दरोडा पडल्याचा दावा एका हॅकरने केला असून तब्बल 1 टेराबाइट संवेदनशील डेटा डार्क वेबवर मोफत प्रसिद्ध करण्यात आला. लीक झालेल्या या डेटासेटमध्ये बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांची वैयक्तिक माहिती, खात्यांचे डिटेल्स, लोन अर्ज, अंतर्गत ऑडिट रिपोर्ट्स, एटीएम व शाखांचे रेकॉर्ड्स आणि नेटबँकिंग युझर इन्फॉर्मेशनचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला. जर हा दावा खरा ठरला, तर भारतीय बँकिंग इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी सायबर घटना ठरु शकते.

'कॅशलेसकन्झ्युमर'चे संस्थापक श्रीकांत लक्ष्मणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी 'रॅन्समवेअर.लाइव्ह' या सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवणाऱ्या साईटवर हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला. हॅकरने दाव्याच्या पुष्टीसाठी काही डॉक्युमेंट इंटरनेटवर सार्वजनिक केले, ज्याची तपासणी केली असता ते बँक ऑफ बडोदाचेच खरे दस्तऐवज असल्याचे दिसून आले.

यामध्ये 'बॉब वर्ल्ड' ऑडिट रिपोर्ट्स आणि दक्षता तपासणीच्या नोंदींचा समावेश असून लक्ष्मणन यांनी या परिस्थितीचे वर्णन 'सायबर कॅटॅस्ट्रॉफ' असे केले. या सायबर हल्ल्यामागे 'ट्रिपलएक्स' नावाचा नवीन सायबर गुन्हेगार गट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे, ज्याने यापूर्वी इंडोनेशियातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेचा 2 टीबी डेटा चोरी केला होता.

दरम्यान, या धक्कादायक दाव्यावर बँक ऑफ बडोदा, भारतीय सायबर आपत्कालीन प्रतिसाद पथक किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. डेटा खरोखरच बँकेच्या मूळ सिस्टीममधून लीक झाला की नाही, याची स्वतंत्र पडताळणी सुरु आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बँकेच्या ग्राहकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. ग्राहकांनी आपली बँक खाती नियमित तपासावीत, संशयास्पद व्यवहार दिसल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधावा आणि कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, पिन किंवा नेटबँकिंगचा पासवर्ड कोणाशीही शेअर करु नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT