Bank FD Rate  Dainik Gomantak
अर्थविश्व

Bank FD: एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' सरकारी बँकेने केली मोठी घोषणा!

Bank FD: जर तुम्हीही बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर आता सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

Manish Jadhav

Bank FD Latest Rates: ज्यांची बँक खाती आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्हीही बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर आता सरकारी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.

आजही बँकेत एफडी उघडणे हा बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. बँक ऑफ बडोदाने आता व्याजदरात मोठी वाढ केली आहे.

तुम्हीही या बँकेत एफडी केली असेल, तर तुम्हाला अधिक व्याजाचा लाभ मिळेल. बँकेने आपल्या बडोदा तिरंगा प्लस ठेव योजनेवर (Baroda Tiranga Plus Deposit Scheme) व्याजदर वाढवले ​​आहेत, ज्याचा कालावधी 399 दिवसांचा आहे.

12 मे पासून व्याजदर लागू

जर तुम्ही 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी करत असाल, तर 7.25 टक्के ते 7.75 टक्के दराने व्याजाचा लाभ बॅंकेकडून दिला जात आहे.

बँकेने 12 मे पासून नवीन दर लागू केले आहेत. बँकेने व्याजदरात (Interest Rate) 20 आधार अंकांची वाढ केली आहे. फर्स्ट बँक 7.05 टक्के ते 7.75 टक्के व्याजाचा लाभ ग्राहकांना देत आहे.

सामान्य नागरिकांसाठी व्याजदर-

>> 7 ते 45 दिवसांची एफडी – 3 टक्के

>> 46 ते 180 दिवसांची FD – 4.5 टक्के

>> 181 ते 210 दिवसांची FD – 4.5 टक्के

>> 211 दिवस किंवा त्यापेक्षा कमी FD – 5.75 टक्के

>> एक ते दोन वर्षांचा कालावधी - 6.75 टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर-

>> 7 ते 45 दिवसांची एफडी – 3.5 टक्के

>> 46 ते 180 दिवसांची एफडी – 5 टक्के

>> 181 ते 210 दिवसांची FD – 5.75 टक्के

>> 211 दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीची FD - 6.25 टक्के

>> एक ते दोन वर्षांचा कालावधी - 7.25 टक्के

बडोदा तिरंगा प्लस योजनेचे फायदे

याशिवाय, बँक बडोदा तिरंगा प्लस ठेव योजनेचा (399 दिवस) लाभ ग्राहकांना (Customers) देत आहे. सामान्य नागरिकांबद्दल बोलायचे झाल्यास, या लोकांना 7.25 ते 7.75 टक्के व्याजाचा लाभ मिळतो.

कोणत्या कालावधीत किती व्याज मिळत आहे?

याशिवाय, 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या एफडीबद्दल बोलायचे झाल्यास, सर्वसामान्य नागरिकांना 6.25 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे.

त्याचबरोबर, ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय, 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या व्याजदराबद्दल बोलायचे झाल्यास, सामान्य नागरिकांना 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळत आहे.

2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर, बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.05 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.55 टक्के व्याजदर देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT