auto story want to buy a new car under 4 lakhs these 3 are best option DainikGomantak
अर्थविश्व

4 लाखांपेक्षा कमी किंमतीत नवीन कार, मायलेज 31KM पेक्षा जास्त

4 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या 'या' 3 कारची वैशिष्ट्ये घ्या जाणून

दैनिक गोमन्तक

हॅचबॅक कार भारतात सर्वाधिक विकल्या जातात. हे किमतीत किफायतशीर आहेत, तसेच लहान कुटुंबासाठी योग्य पर्याय आहेत. तुम्हालाही नवीन कार घ्यायची असेल आणि बजेट थोडे कमी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला 4 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या 3 कारबद्दल सांगत आहोत.

मारुती सुझुकी अल्टो (रु. 3.25 लाख)

हे वाहन दोन दशकांपासून भारतीय बाजारपेठेत आहे. कारची किंमत रु. 3.25 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. हे सीएनजी पर्यायात देखील येते. CNG सह कारचे मायलेज 31KM पेक्षा जास्त आहे. यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, आणि फ्रंट ड्युअल एअरबॅग देण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकी एस-प्रेसो (रु. 3.85 लाख)

कारची किंमत रु.3.85 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हे 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल (Petrol) इंजिन देण्यात आले आहे. जे 67bhp/90Nm जनरेट करते. अल्टो प्रमाणे, हे CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 31KM पेक्षा जास्त मायलेज देते. वैशिष्ट्यांच्या यादीमध्ये सेंट्रली माउंटेड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टुडिओसह टचस्क्रीन सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, (Airbags) यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विचेस, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

डैटसन रेडी गो (किंमत रु. 3.98 लाख)

डैटसन रेडी गो हॅचबॅक किंमत 4.52 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. यात 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. यात LED DRLs, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवीन ड्युअल-टोन 14-इंच व्हील कव्हर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सह 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि कीलेस एंट्री यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT