Get cash through UPI in these five steps
Get cash through UPI in these five steps Dainik Gomantak
अर्थविश्व

ATM मधून पैसे काढण्यासाठी आता कार्डची गरज नाही; UPI द्वारे या पाच स्टेप्समध्ये मिळवा कॅश

Ashutosh Masgaunde

ATM withdrawals no longer require a card; Get cash through UPI in these five steps:

एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची कोणालाही गरज भासणार नाही. देशातील पहिले व्हाईट लेव्हल UPI-ATM नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या सहकार्याने हिताची पेमेंट सर्व्हिसेसने हे लॉन्च केले आहे. याद्वारे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय UPI द्वारे रोख रक्कम काढू शकतात.

काही दिवसांपूर्वी, RBI ने UPI द्वारे रोख पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल माहिती देणारे परिपत्रक जारी केले होते.

सर्व बँका, एटीएम नेटवर्क, एटीएम ऑपरेटर्सनी त्यांच्या एटीएममध्ये इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे या परिपत्रकात म्हटले आहे.

हिताचीने ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये UPI-ATM लाँच केले आणि कॅश काढण्याच्या स्टेप्सचा डेमो दाखवला. Hitachi चे MD आणि CEO सुमिल विकमसे यांनी लॉन्च प्रसंगी सांगितले की कंपनी भारतातील पहिले UPI-ATM लाँच करत आहे जे व्हाईट लेबल एटीएमचा प्रकार असेल.

नॉन-बँकिंग सेवा देणाऱ्या कंपनीच्या मालकीच्या, देखरेखीच्या आणि ऑपरेट केलेल्या एटीएम मशीन्सना व्हाईट लेबल एटीएम म्हणतात.

ATM मधून UPI द्वारे पैसे काढण्यासाठी स्टेप्स

  • पहिल्यांदा कार्डलेस कॅश पर्याय निवडा

  • स्क्रीनवर दिसत असलेल्या पर्यायांमधून रक्कम निवडा.

  • तुमचे UPI अॅप वापरून QR कोड स्कॅन करा.

  • ट्रन्झॅक्शन व्हिलिडेट करण्यासाठी तुमचा UPI पिन एंटर करा.

  • तुमची रोख रक्कम कलेक्ट करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT