Money Dainik Gomantak
अर्थविश्व

Atal Pension Yojana: सरकार दरमहा देणार 6 हजार रुपये पेन्शन, लवकर अर्ज करा

Pension Yojana Scheme: पेन्शनचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे.

दैनिक गोमन्तक

Pension Apply Online: पेन्शनचे नियोजन खूप महत्त्वाचे आहे. रिटायरमेंट सिक्युर करण्यासाठी तुम्हीही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अटल पेन्शन योजनेबद्दल (APY) सांगणार आहोत, ज्यामध्ये पती-पत्नी स्वतंत्र खाते उघडून दरमहा 6,000 रुपये पेन्शन मिळवू शकतात. या योजनेचे आणखी बरेच फायदे आहेत (अटल पेन्शन फायदे). त्याबद्दल जाणून घेऊया...

अटल पेन्शन योजना काय आहे?

अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) ही अशी सरकारी योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक (Investment) तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत, तुम्हाला किमान मासिक पेन्शन रुपये 1,000, 2000 रुपये, रुपये 3000, रुपये 4000 आणि कमाल 5,000 रुपये मिळू शकतात. ही सुरक्षित गुंतवणूक आहे.

कोण गुंतवणूक करु शकते?

अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली. त्यावेळी ही योजना असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरु करण्यात आली होती, परंतु आता 18 ते 40 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करु शकतो. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन (Pension) मिळू लागते.

6,000 रुपये पेन्शन कसे मिळेल

या योजनेत 39 वर्षांखालील पती-पत्नी अर्ज करु शकतात. जर पती-पत्नीचे वय 25 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ते APY खात्यात दरमहा 226 रुपये योगदान देऊ शकतात. जर पती-पत्नीचे वय 35 वर्षे असेल, तर त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांच्या संबंधित APY खात्यात 543 रुपये जमा करावे लागतील. गॅरंटीड मासिक पेन्शन व्यतिरिक्त, जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यास, हयात असलेल्या जोडीदाराला प्रत्येक महिन्याला पूर्ण आयुष्य पेन्शनसह 5.1 लाख रुपये मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पणजीत खळबळ! बसस्थानकाजवळ आढळला छत्तीसगडच्या 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

AUS W vs PAK W: भारतीय वंशाच्या अलाना किंगची कमाल, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला नवा इतिहास; मोडला 22 वर्ष जुना रेकॉर्ड

IND U19 vs AUS U19: 18 षटकार, 257 धावा! 14 वर्षीय 'वैभव' सूर्यवंशीचं ऑस्ट्रेलियात वादळ; युथ टेस्ट आणि वनडेत केला मोठा धमाका

मुलाचा घटस्फोट, आईने घातला दुधाने अभिषेक; 'हॅप्पी डिव्होर्स' केक कपणाऱ्या तरुणाचा Video Viral

म्हापसा दरोडा! 30 तास उलटले, हाती धागेदोरे नाहीत; खबर मिळताच तातडीने नाकाबंदी न केल्यानेच दरोडेखोरांचे फावले

SCROLL FOR NEXT