Railway Minister Ashwini Vaishnaw  Dainik Gomantak
अर्थविश्व

Indian Railway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, अश्विनी वैष्णव यांनी केली मोठी घोषणा

CSMT: वैष्णव म्हणाले की, 'भारत तीन वर्षांत रेल्वे तंत्रज्ञानाची निर्यात सुरु करेल, जी दीर्घकाळ आयातदार राहिल्यानंतर मोठी उपलब्धी असेल.'

Manish Jadhav

Indian Railway: मुंबईतील 18,000 कोटी रुपयांच्या सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाचे कॉन्टॅक्ट मार्चच्या मध्यापर्यंत दिले जाईल, असे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव एका कार्यक्रमात बोलत असताना सांगितले. वैष्णव म्हणाले की, 'भारत तीन वर्षांत रेल्वे तंत्रज्ञानाची निर्यात सुरु करेल, जी दीर्घकाळ आयातदार राहिल्यानंतर मोठी उपलब्धी असेल.'

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्पाबाबत वैष्णव म्हणाले की, “मार्चच्या मध्यात करार मंजूर होईल. मुंबईतील (Mumbai) प्रत्येक विभागाने या प्रकल्पाला होकार दिला आहे.''

CSMT

कमी जागेचा प्रश्न भेडसावणाऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार असून प्रवाशांची ये-जा सुलभ होईल, असेही ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पुनर्विकास प्रकल्प काही वर्षे केवळ कागदावरच होता.

अदानी समूहासह (Adani Group) नऊ युनिट्सना हा प्रकल्प घ्यायचा आहे. वैष्णव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत असताना विकासात रस नव्हता, असा टोलाही लगावला.

हाय स्पीड रेल्वे

अहमदाबाद-मुंबई दरम्यान हायस्पीड रेल्वेसारख्या प्रकल्पात एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर झपाट्याने प्रगती झाल्याचे ते म्हणाले. बुलेट ट्रेनसाठी 152 किलोमीटरचे खांब तयार करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. वंदे भारत ट्रेनचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, अभियंत्यांना वंदे भारतची 220 किमी प्रतितास वेगाची ट्रेन विकसित करायची आहे, जी 160 किमी प्रतितास वेगाने पुढे जाईल.

वंदे भारत ट्रेन

त्याचबरोबर वंदे भारत ट्रेन सिस्टिमची निर्यातही करता येईल, असे संकेत त्यांनी दिले. ते पुढे असेही म्हणाले की, येत्या तीन वर्षांत भारत रेल्वे तंत्रज्ञानाची निर्यात सुरु करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camurlim Gram Sabha: कामुर्ली ग्रामसभेत राडा! महिला उपसरपंचास तरुणाकडून मारहाण; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Anjuna Gramsabha: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Pilgao Mining Protest: पिळगावचे वातावरण तापले; आंदोलनात महिलांची उडी, तिसऱ्या खनिज वाहतूक बंदच

Indian Coast Guard: अंदमानजवळ बोटीतून सहा हजार किलोचे अमली पदार्थ जप्त, तटरक्षक दलाची कारवाई

Goa Live News: बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा 295 धावांनी विजय

SCROLL FOR NEXT