Indian Railways: रेल्वेमंत्र्यांनी अशी माहिती दिली, ऐकून रेल्वे प्रवाशांना झाला आनंद!

Indian Railways: येत्या काही वर्षांत देशाला रेल्वेचे नवे रुप पाहायला मिळेल, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले आहे.

Railway Minister Ashwini Vaishnav
Railway Minister Ashwini VaishnavDainik Gomantak

Indian Railways: येत्या काही वर्षांत देशाला रेल्वेचे नवे रुप पाहायला मिळेल, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केले आहे. भारतीय रेल्वेने आज देशातील 9वी आणि 10वी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरु केली आहे. यावेळी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, येत्या काही वर्षांत देशातील जनतेला रेल्वेचे नवे रुप पाहायला मिळेल.

अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली

रेल्वेमंत्री म्हणाले की, वंदे भारत ट्रेनच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींचा देशातील अभियंते, तंत्रज्ञ, वेल्डर आणि फिनिशर्सवरचा विश्वास सिद्ध झाला आहे. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यानंतर दररोज हजारो प्रवाशांना (Passengers) याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हे मुंबई, सोलापूर, शिर्डी, दादर, ठाणे, लोणावळा, पुणे आणि कुदुरवाडीच्या आसपासच्या प्रवाशांना सेवा देईल.


Railway Minister Ashwini Vaishnav
Indian Railways ची मोठी घोषणा! या प्रवाशांसाठी पहिल्यांदाच उचलण्यात आले 'हे' पाऊल

पीएम मोदींनी ग्रीन सिग्नल दाखवला

विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, वंदे भारतच्या मुंबई-शिर्डी दरम्यानचा सरासरी वेग ताशी 60 किलोमीटर इतका असेल. मुंबई ते सोलापूर दरम्यान या ट्रेनचा सरासरी वेग सुमारे 70 किमी प्रतितास असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com