Communication Minister Ashwini Vaishnav Dainik Gomantak
अर्थविश्व

BSNL ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, केंद्रीय मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

BSNL To Roll Out 5G: BSNL वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी.

दैनिक गोमन्तक

BSNL To Roll Out 5G: BSNL वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मोठी घोषणा केली आहे. भारत सरकार लवकरच येत्या 2 वर्षात 25000 दूरसंचार टॉवर्स म्हणजेच मोबाईल टॉवर्स बसवण्याची तयारी करत आहे. अशी माहिती दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. नवीन टॉवर उभारण्यासाठी सरकारने 36,000 कोटी रुपये मंजूर केल्याचेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी नुकतीच देशात 5G सेवा सुरु केली आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यांच्या आयटी मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित केले. या बैठकीत जवळपास सर्वच राज्यांच्या आयटी मंत्र्यांनी कनेक्टिव्हिटी हे आव्हान असल्याचे सांगून याबद्दल चिंता व्यक्त केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Union Minister Ashwini Vaishnav) यांच्यासोबत सर्व राज्यमंत्र्यांची बैठक दिल्लीत (Delhi) 6 व्या इंडियन मोबाईल काँग्रेसच्या निमित्ताने होत होती. जोपर्यंत कनेक्टिव्हिटीचा संबंध आहे, राज्यांना कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हेवी लिफ्टिंग करावे लागेल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

बीएसएनएलची सेवा अधिक चांगली होईल

मंत्रिमहोदयांनी 8 महिन्यांत PM गति शक्ती मास्टर प्लॅनमध्ये सामील झाल्याबद्दल सर्व राज्य सरकारांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, 'एकत्र काम केल्याने चांगले परिणाम मिळत आहेत.' भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची पुनर्स्थापना करुन कनेक्टिव्हिटीची समस्या बर्‍याच प्रमाणात सोडवली जाईल, असा विश्वास या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, "बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी आमच्याकडे 1.64 लाख कोटी रुपये आहेत, जे त्याच्या भांडवली गुंतवणुकीची आणि तंत्रज्ञान अपग्रेडेशनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत."

अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार

याआधी केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली होती की, पुढील 6 महिन्यांत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G सेवा मिळण्यास सुरुवात होईल. इंडिया मोबाईल काँग्रेसनंतर लगेचच त्यांनी ही घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT