Delhi High Court Dainik Gomantak
अर्थविश्व

Delhi High Court: अश्नीर ग्रोव्हरच्या अडचणी वाढल्या, दिल्ली उच्च न्यायालयाने बजावले समन्स

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी भारत पे पेमेंट अॅपचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांना समन्स बजावले.

दैनिक गोमन्तक

Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी भारत पे पेमेंट अॅपचे माजी व्यवस्थापकीय संचालक अश्नीर ग्रोव्हर यांना समन्स बजावले. कंपनीच्या सहसंस्थापकाच्या याचिकेवर त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. याचिकेत ग्रोव्हर यांना देण्यात आलेल्या शेअर्सवर दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, न्यायमूर्ती प्रतिक जालान यांनी ग्रोव्हर यांच्या वकिलाच्या निवेदनाची दखल घेतली. ग्रोव्हर यांना एका आठवड्यात या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान, अर्जावरील उत्तर चार आठवड्यात दिले जाईल. भारत पेचे सह-संस्थापक भाविक कोलाडिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात (Court) सुनावणी सुरु आहे. त्यात त्यांनी ग्रोव्हर यांना 1,600 शेअर्स विकल्याचे म्हटले आहे. ज्याची किंमत सुमारे 88 लाख होती. मात्र, ही रक्कम त्यांना देण्यात आली नाही.

दुसरीकडे, कोलाडिया आणि शास्वत नाकराणी यांनी जुलै 2017 मध्ये भारतपेची स्थापना केली होती. तथापि, मार्च 2018 पर्यंत त्याची स्थापना झाली नाही. ग्रोव्हर जून 2018 मध्ये कंपनीत रुजू झाले आणि मार्च 2022 मध्ये त्यांनी राजीनामा (Resignation) दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजमध्ये मालिकेसाठी आरपारची लढाई! पाचव्या टी-20 साठी प्लेइंग-11 मध्ये कोणाला मिळणार संधी, कोणाचा पत्ता कट होणार?

Tarun Tejpal Case: तेजपालच्या याचिकांवरील सुनावणी 3 नोव्हेंबरला; जन्मठेपेच्या मागणीवरही लक्ष

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

SCROLL FOR NEXT