Tim Cook|Apple|iPhone Dainik Gomantak
अर्थविश्व

मालामाल! Apple चे CEO टिम कूक यांनी 5 लाख शेअर्स विकून कमावले 350 कोटी रुपये

Tim Cook यांनी शेअर्स नक्कीच विकले आहेत पण या विक्रीचा ऍपल कंपनीतील त्याच्या एकूण मालकीवर कोणाताही परिणाम होणार नाही. कारण कूक यांनी जितके शेअर्स विकले आहेत तितकेच शेअर्स त्यांना वार्षिक भरपाई योजनेअंतर्गत मिळाले आहेत.

Ashutosh Masgaunde

Apple CEO Tim Cook sold 5 lakh shares and earned Rs 350 crore:

अ‍ॅपल कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी नुकतेच त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात विकले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले आहे की, कूक यांच्या शेअर्सची ही विक्री यूएस सिक्युरिटीज फाइलिंगद्वारे उघड झाली आहे.

फाइलिंगनुसार, कूक यांनी 511,000 शेअर्स विकले, ज्याची किंमत टॅक्स न वगळता 87.8 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.

याचा अर्थ त्यांना या विक्रीतून करानंतर 41.5 दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. भारतीय चलनात हे अंदाजे 345.38 कोटी रुपये आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने शेअर्स विकल्यानंतर कूक यांच्याकडे अ‍ॅपलचे जवळपास 33 लाख शेअर्स शिल्लक आहेत, ज्यांची किंमत सुमारे 565 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे.

कूक यांनी जवळपास 2 वर्षांनंतर इतकी मोठी विक्री केली आहे. यापूर्वी ऑगस्ट 2021 मध्ये स्टॉक विक्रीतून त्यांनी 355 दशलक्ष डॉलर्स कमावले होते.

कूक यांनी शेअर्स नक्कीच विकले आहेत पण या विक्रीचा अ‍ॅपल कंपनीतील त्यांच्या एकूण मालकीवर परिणाम होणार नाही.

कारण कूक यांनी जितके शेअर्स विकले आहेत तितकेच शेअर्स त्यांना वार्षिक भरपाई योजनेअंतर्गत मिळाले आहेत.

अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांच्याव्यतिरिक्त डियर्डे ओ'ब्रायन आणि कॅथरीन अ‍ॅडम्स यांनीही अ‍ॅपलमधील शेअर्स विकले आहेत. या विक्रीतून दोघांनीही करांपूर्वी 11 दशलक्ष डॉलर्स कमावले आहेत.

Deirdre O'Brien Apple मध्ये रिटेलसाठी वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत. कॅथरीन या Apple च्या जनरल काउंसिल आणि कायदेशीर आणि जागतिक सुरक्षा च्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: नितेश राणेंच्या मागणीला केंद्राचा 'ग्रीन' सिग्नल, गणेशोत्सव काळात 'कोकणात' धावणार 16 डब्यांची 'वंदे भारत एक्स्प्रेस'

Rashi Bhavishya 24 August 2025: सन्मान मिळण्याची शक्यता, महत्त्वाचे निर्णय घेण्यास घाई करू नका; आजचा दिवस उत्साही

Cristiano Ronaldo Record: ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावावर नवा 'वर्ल्ड रेकॉर्ड', अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला

Borim Accident: साकवार- बोरीत पार्क केलेल्या टेम्पोला कारची धडक

Goa Kadamba: गणेश चतुर्थीसाठी प्रवाशांची सोय; कदंब बसच्या आंतरराज्यीय फेऱ्या वाढणार

SCROLL FOR NEXT