Anant Ambani Dainik Gomantak
अर्थविश्व

Mukesh Ambani: अंबानींचं ठरलं! अनंत अंबानी सांभाळणार 'हा' व्यवसाय, राधिकाशी झाला साखरपुडा

Anant Ambani News: याआधी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा आपल्या जुळ्या मुलांसोबत पहिल्यांदाच घरी पोहोचली होती.

दैनिक गोमन्तक

Anant Ambani Latest News: मुकेश अंबानींच्या घरी आणखी एक छान सोहळा पार पडला. देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. गुरुवारी राधिका मर्चंटसोबत अनंतचा साखरपुडा झाला. याआधी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा आपल्या जुळ्या मुलांसोबत पहिल्यांदाच घरी पोहोचली होती. रिलायन्स ग्रुपमध्ये अनंत अंबानी कोणता बिझनेस हाताळत आहेत ते जाणून घ्या...

अनंत नवीन ऊर्जा व्यवसाय सांभाळतील

अनंत अंबानीचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स न्यू एनर्जी बिझनेसची कमान अनंत यांच्याकडे सोपवली आहे. या व्यवसायाची जबाबदारी अनंत अंबानी सांभाळतील. सध्या ते Reliance 02C आणि Reliance New Solar Energy चे संचालक म्हणून काम करत आहेत.

तीनही मुलांना हा व्यवसाय दिला

मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश टेलिकॉम व्यवसायाची धुरा सांभाळत आहे, तर मुलगी ईशा रिटेल व्यवसाय सांभाळत आहे. धाकटा मुलगा अनंत नवीन ऊर्जा व्यवसायाची जबाबदारी स्वीकारणार आहे.

यापूर्वी जिओ प्लॅटफॉर्मलाही जबाबदारी देण्यात आली होती

याशिवाय, फेब्रुवारी 2021 मध्ये अनंतला रिलायन्स O2C चे संचालक बनवण्यात आले आहे. त्याचवेळी, याआधी, अनंतचा जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्सच्या (Reliance) रिटेल उपक्रमांच्या बोर्डात देखील समावेश होता.

अनंतचे शिक्षण कुठून झाले?

अनंत अंबानी यांच्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांनी ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी रिलायन्स समूहाचा व्यवसाय पुढे नेण्यास सुरुवात केली. राधिकाबद्दल बोलायचे झाल्यास तर ती गुजराती कुटुंबातील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

SCROLL FOR NEXT