AMUL Cartoon Insta/ Amul
अर्थविश्व

'टाटा रहे मेरा दिल' Air India-Tata ऐतिहासिक डीलवर अमूलचं रिएक्शन

टाटा आणि एअर इंडियाच्या या ऐतिहासिक करारावर अमूलने आपले नवीन व्यंगचित्र तयार केले आहे.

दैनिक गोमन्तक

एअर इंडिया जवळपास 7 दशकांनंतर टाटांकडे परत आली आहे. एअर इंडिया (Air India) गेल्या आठवड्यात टाटांकडे ((Tata) Group) सोपवल्यानंतर प्रतिक्रियांचा वर्षाव सोशल मिडियावर सुरू झाला आहे. रतन टाटांपासून ते आनंद महिंद्रापर्यंत सर्वांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसिद्ध डेअरी ब्रँड अमूल (AMUL) देखील त्यांच्या मनोरंजक कार्टूनमुळे या यादीत सामील झाला आहे. अमूल कंपनीने इंस्टाग्रामवर एक मनोरंजक पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे, ज्याला युजर्सनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

टाटा आणि एअर इंडियाच्या या ऐतिहासिक करारावर अमूलने आपले नवीन व्यंगचित्र तयार केले आहे. जुन्या बॉलीवूड गाण्याच्या ओळींवर हे कार्टून तयार करून, टाटा रहे मेरा दिल असे ठळक अक्षरात लिहिले आहे. तसेच Amul in Good Hands असाही उल्लेख करण्यात आला आहे.

कॉकपिटमध्ये टाटा आणि महाराज एकत्र

समकालीन विषयांवर कार्टून बनवण्यासाठी अमूल ब्रँड खूप लोकप्रिय आहे. अमूलच्या या व्यंगचित्रांमध्ये अमूल गर्ल दाखवून संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ताज्या कार्टूनमध्ये अमूलची मुलगी कॉकपिटमध्ये पायलट म्हणून दाखवण्यात आली आहे. अमूलच्या मुलीच्या शेजारी एक लहान मुल बसले आहे जी त्याला हात दाखवत अभिनंदन करताना दिसते. मुलाचा चेहरा टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांच्यासारखा बनवण्यात आला आहे.

टाटां समूहाच्या सेवेत बदल

टाटां समूहाच्या हाती एअर इंडिया गेल्यानंतर प्रवाशांना अनेक बदल पहायला मिळत आहेत. टाटा समूहाने सातत्याने सांगितले आहे की, एअर इंडियाची कामगिरी सुधारण्यावर आणि प्रवाशांना पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा सुधारण्यावर आपले पहिले लक्ष्य असेल. टाटा समूहाने पहिल्या दिवसापासून या दिशेने काम सुरू केले आहे. याचाच भाग म्हणून पहिल्या दिवशी चार फ्लाइट्सवर जेवणांच्या मेन्यूत सुधारणा केली आहे. कंपनी हळूहळू सर्व फ्लाइट्सवर ही सेवा सुरू करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT