Union Home and Cooperation Minister Amit Shah Dainik Gomantak
अर्थविश्व

Sahara India Refund: सहारा इंडियाच्या गुंतवणूकदारांना लागली लॉटरी! अमित शाहंनी ट्रान्सफर केले पैसे; लगेच चेक करा

Manish Jadhav

Sahara India Refund: तुमचे पैसेही सहारा इंडियामध्ये अडकले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी लॉटरीपेक्षा कमी नाही. होय, सहारात अडकलेले पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्र सरकारने सहारा रिफंड पोर्टल सुरु केले.

यावर लाखो गुंतवणूकदारांनी त्यांच्या परताव्यासाठी दावा केला आहे. आता सरकारने सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या गुंतवणूकदारांच्या दाव्याची रक्कम हस्तांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, इतक्या वर्षांनी पैसे परत मिळणे हे लॉटरीपेक्षा कमी नाही.

गुंतवणूकदारांच्या हक्काची रक्कम हस्तांतरित केली

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सहारा समूहाच्या सहकारी संस्थांच्या गुंतवणूकदारांच्या दाव्याची रक्कम सहारा रिफंड पोर्टलद्वारे हस्तांतरित केली.

यावेळी ते म्हणाले की, मोदी सरकार सहारा समूहाच्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सहारा रिफंड पोर्टलद्वारे पैसे परत मिळवण्यासाठी गुंतवणूकदारांना त्यांची आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

परताव्यासाठी अपलोड करावयाच्या कागदपत्रांमध्ये गुंतवणूकदाराचे (Investors) नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि पैसे जमा केल्याची पावती इत्यादींचा समावेश आहे.

10,000 रुपयांपर्यंतची रक्कम पाठवली जातेय

सहारा समूहाच्या सहकारी संस्थेत अडकलेल्या कोट्यवधी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी केंद्र सरकारने (Government) केंद्रीय सहकार निबंधक (CRCS) पोर्टल सुरु केले आहे. पोर्टलवर 15 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांनी नोंदणी केली आहे.

पहिल्या टप्प्यात 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जात आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे, त्यांना सध्या फक्त 10,000 रुपये परत केले जात आहेत. सहारा रिफंड पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या सातत्याने वाढत आहे.

112 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवले

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पोर्टल लाँच करताना सांगितले होते की, पोर्टलवर अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या खात्यात पोहोचतील. अन्य गुंतवणूकदारांचे पैसे परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

112 लाभार्थ्यांच्या खात्यावर परतावा हस्तांतरित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे.

शाह पुढे म्हणाले की, 112 गुंतवणूकदारांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे. सहाराच्या रिफंड पोर्टलवर आतापर्यंत 18 लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT