Amazon Dainik Gomantak
अर्थविश्व

Amazon Alexa डिव्हिजनमधील शेकडो कर्मचाऱ्यांना देणार नारळ; जाणून घ्या काय आहे कारण?

Amazon Alexa आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर नव्याने लक्ष केंद्रित करत आहे.

Manish Jadhav

Amazon Alexa आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वर नव्याने लक्ष केंद्रित करत आहे. यातच, अॅमेझॉन भारतासह त्याच्या अलेक्सा डिव्हिजनमधून शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकत आहे. अॅमेझॉनच्या मते, लेऑफमुळे अलेक्सासाठी काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल.

अलेक्सा आणि फायर टीव्हीचे उपाध्यक्ष डॅनियल रौश म्हणाले की, “कंपनी शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. आम्ही आमच्या बिजनेस प्रॉयरटीजीला अधिक महत्त्व देत आहोत. आम्ही जेनेरिक AI वर लक्ष्य केंद्रित करत आहोत.''

कंपनीने म्हटले आहे की, ''अशा बदलांमुळे काही उपक्रम थांबवले जाऊ शकतात. अनेक लोकांच्या भूमिका संपुष्टात येत आहेत. कंपनी पुढील आठवड्यात भारतातील (India) प्रभावित सहकाऱ्यांशी चर्चा करेल.'' अ‍ॅमेझॉनने हा उपक्रम बंद करण्याबाबत अधिक माहिती दिली नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

कंपनी कपात का करत आहे?

डॅनियल रौश म्हणाले की, ''जनरेटिव्ह एआय मधील गुंतवणूक आम्हाला पूर्वीपेक्षा अधिक सहज, इंटेलिटेंट आणि उपयुक्त अलेक्सा साठी आमच्या दृष्टीकोनाला अधिक जवळ आणत आहे." कर्मचाऱ्यांच्या मेमोमध्ये म्हटले आहे की, “आम्ही यूएस आणि कॅनडातील (Canada) सहकाऱ्यांपर्यंत पोहोचू ज्यांना टाळेबंदीचा फटका बसला आहे.

सूचना ईमेल लवकरच पाठवले जातील, आणि आम्ही अपेक्षा करतो की, यूएस आणि कॅनडामधील सर्व सूचना आज सकाळी पूर्ण होतील (पॅसिफिक वेळ).

कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना मदत पॅकेज मिळेल

कंपनी प्रभावित कर्मचार्‍यांना एक पॅकेज प्रदान करत आहे, ज्यात सेपरेशन देयके, ट्रांसिशनल आरोग्य विमा लाभ, बाह्य नोकरी प्लेसमेंट सहाय्य आणि नोकरी शोधण्यासाठी सशुल्क वेळ समाविष्ट आहे.

अॅमेझॉनमधील डिवाइसेस आणि सर्विसेज डिव्हिजनचे प्रभारी डेव्ह लिंप यांनी ऑगस्टमध्ये कंपनीतून बाहेर पडण्याची घोषणा केली होती. त्यावेळी मायक्रोसॉफ्टचे माजी एक्झिक्युटिव्ह पनोस पानाय यांनी त्यांची जागा घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT