Amazon Lay Off: जागतिक मंदीबाबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान, जगभरातून टाळेबंदीच्या बातम्या पुन्हा येऊ लागल्या आहेत. यातच आता ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची योजना आखली आहे. कंपनी मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात करत आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
जगभरातील 18,000 नोकऱ्या काढून टाकण्याच्या कंपनीच्या निर्णयामुळे भारतातील (India) सुमारे 1,000 कर्मचारी प्रभावित होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. आणखी एका सूत्राने सांगितले की, अॅमेझॉनचे (Amazon) भारतात एक लाख कर्मचारी आहेत. येथील एक टक्का कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. मात्र, याबाबत विचारले असता अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
खरेतर, अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे Amazon जगभरातील 18,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. अलीकडेच Amazon CEO अँडी जेस्सी यांनी यासंबंधी एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्यांनी जागतिक स्तरावर 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या कंपनीच्या निर्णयाची माहिती दिली होती.
जेस्सी यांच्या निवेदनानुसार, आम्ही सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहोत. या निर्णयाचा फटका अनेकांना बसणार आहे. तथापि, बहुतेक पोस्ट Amazon Store आणि PXT (People, Experience and Tech) संस्थेशी संबंधित आहेत.'' तसेच, 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुमारे 16,08,000 पूर्णवेळ आणि अर्धवेळ कर्मचारी आहेत, जे Amazon मध्ये काम करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.