अॅमेझॉन (Amazon) ही जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. आधी ट्विटर, नंतर फेसबुकचा मेटा आणि नंतर मायक्रोसॉफ्ट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आपले कर्मचारी कमी केले आहेत. यानंतर आता अॅमेझॉनही आपल्या कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेणार आहे. या आठवड्यात नोकरदारांना काढून टाकले जाऊ शकते.
या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Amazon कंपनी (Amazon.com Inc) ची विक्री कमी होत आहे, त्यामुळे कंपनीवर खर्च कमी करण्याचा दबाव वाढत आहे. फक्त अॅमेझॉनच नाही तर इतर कंपन्यांमध्ये देखिल हीच स्थिती आहे. यामागे जागतिक मंदी येण्याची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर मोठ्या कंपन्यांनी आपला खर्च कमी करण्यास सुरुवात केली आहे.
31 डिसेंबर 2021 पर्यंत Amazon चे अंदाजे 1,608,000 फूलटाइम आणि हाफटाइम कर्मचारी आहेत. 1 महिन्याच्या प्रदीर्घ पुनरावलोकनानंतर Amazon ने हे करण्याचा निर्णय घेतला आहे. Amazon ने 10,000 कर्मचार्यांना काढून टाकल्यास, Amazon च्या इतिहासातील ही सर्वात मोठी टाळेबंदी असेल. Amazon जगभरात 1.6 दशलक्षाहून अधिक लोकांना रोजगार देते. ज्यामध्ये कंपनी फक्त 1 टक्के कर्मचाऱ्यांना काढणार आहे.
अमेरिका, युरोप यांसारख्या अनेक मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेत चढ-उतारांचा काळ असतो हे माहीत आहे. एकप्रकारे कंपन्या आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून बाहेरचा रस्ता दाखवत आहे.
कंपनीने काय सांगितले
अॅमेझॉन खर्च कमी करण्यासाठी रोबोट्सचा वापर वाढवत आहे. सध्या, अॅमेझॉनने वितरित केलेल्या पॅकेटपैकी सुमारे 3 चतुर्थांश पॅकेट कोणत्या ना कोणत्या रोबोटिक प्रणालीतून गेले आहेत. याबाबत Amazon रोबोटिक्सचे प्रमुख टाई ब्राडी (Ty Brady) सांगतात की, पुढील 5 वर्षांत पॅकेजिंगमध्ये 100% रोबोटिक प्रणाली असू शकते. हे रोबोट्स मानवी कामगारांची जागा किती लवकर घेतील, हे आत्ताच सांगता येणार नाही. कामात नक्कीच बदल होईल, पण माणसाची गरज कायम राहील, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.