खरे किंवा खोटे सोने (Gold) ओळखण्यासाठी टिप्स फॉलो करा: आज 3 मे रोजी, ईद, अक्षय्य तृतीया हे सण देशभरात साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या विशेष मुहूर्तावर लोक या दिवशी सोने खरेदी करतात ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. सोने खरेदी केल्याने घरात संपत्ती येते. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते. या दिवशी लोकं आवर्जून सोने खरेदी करतात. (Akshaya Tritiya 2022 Gold Price)
पण, सध्या बाजारात खऱ्यासोबतच नकली सोनंही मोठ्या प्रमाणात मिळू लागलं आहे. अशा परिस्थितीत सोने खरेदी करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सोने खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतल्यास बनावट सोने खरेदी करणे टाळता येते. चला तर मग जाणून घेवूया सोन्याची शुद्धता तपासण्याचे तंत्र...
सोने खरेदी करताना हॉलमार्किंगची काळजी घ्या
सोने खरेदी करताना त्याच्या हॉलमार्किंगकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांना सरकारकडून सोने खरेदी करताना BIS चे हॉलमार्क पाहण्याचा सल्ला दिला जातो. यावरून हे सोने खरे की बनावट हे कळते. परंतु, हॉलमार्क खरा आहे की खोटा हे ओळखण्यासाठी, तुम्ही हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचे त्रिकोणी चिन्ह आहे का ते तपासा.
बीटीएस अॅपद्वारे खरे सोने ओळखा
तुम्ही बीआयएसच्या बीआयएस केअर अॅपद्वारे खरे आणि बनावट सोने देखील ओळखू शकता. हे अॅप खास खऱ्या आणि बनावट वस्तूंच्या ओळखीसाठी तयार करण्यात आले आहे. अॅपद्वारे तुम्ही ISI मार्क आणि हॉलमार्किंग देखील सहज ओळखू शकता. तुम्ही खरेदी केलेला माल किंवा सोने खोटे असल्याचे या अॅपवर तपासल्यानंतर तुम्हाला कळले तर तुम्ही या अॅपद्वारे त्याबाबत तक्रारही करू शकता.
घरगुती उपायांसह खरे आणि बनावट सोने ओळखा
BIS केअर अॅप व्यतिरिक्त, तुम्ही काही सोप्या घरगुती उपायांद्वारे खरे आणि बनावट सोने देखील ओळखू शकता. पहिला घरगुती उपाय म्हणजे पाण्याची चाचणी करणे. प्रथम तुम्ही दागिना घ्या आणि पाण्यात बुडवा. यानंतर सोने स्थिरावले तर ते खरे सोने आहे. दुसरीकडे, जर ते पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असेल तर ते बनावट आहे. याशिवाय मॅग्नेट टेस्ट करून तुम्ही खरे आणि नकली सोने ओळखू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.