Nayara Energy  Dainik Gomantak
अर्थविश्व

Petrol Diesel Price: खूशखबर! पेट्रोल अन् डिझेलच्या मोठी दरात घसरण, कच्च्या तेलाच्या दरात...!

Nayara Energy Petrol Price: गेल्या एक वर्षापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही.

Manish Jadhav

Nayara Energy Petrol Price: गेल्या एक वर्षापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही विशेष बदल झालेला नाही. मे 2022 मध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेल्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली होती.

यानंतर पेट्रोल आठ रुपयांनी तर डिझेल पाच रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर, विविध शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाल्याचे पाहायला मिळाले.

आता खासगी क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी नायरा एनर्जीने सरकारी तेल विपणन कंपन्यांपेक्षा पेट्रोल आणि डिझेल 1 रुपये कमी दराने विकण्यास सुरुवात केली आहे.

दुसऱ्या पंपावरुन 1 रुपये कमी द्यावे लागतील

म्हणजेच नायराच्या पेट्रोल पंपावरुन पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास इंडियन ऑईल आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपापेक्षा एक रुपया कमी द्यावा लागेल.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि त्यांचे UK भागीदार BP PLC (BP PLC) आधीच PSU कंपन्यांपेक्षा कमी दराने पेट्रोल-डील विकत आहेत.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती घसरल्यानंतरही देशांतर्गत बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत कोणताही बदल केला नाही.

ग्राहकांना घसरणीचा फायदा देणाऱ्या कंपन्या

दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणाऱ्या खासगी कंपन्या या घसरणीचा फायदा ग्राहकांना देत आहेत.

ग्राहकांना (Customers) अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी आम्ही आमच्या रिटेल आउटलेटवर जून 2023 अखेरपर्यंत 1 रुपये सूट देत आहोत."

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही भारताच्या ऊर्जा गरजांसाठी एक मजबूत भागीदार असण्यावर विश्वास ठेवतो आणि देशाची मागणी पूर्ण करत राहू.' नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोलमध्ये किंचित घट दिसून आली.

तसेच, नायरा एनर्जीची देशातील 86,925 पेट्रोल पंपांमध्ये 7 टक्क्यांहून अधिक भागीदारी आहे. कंपनी महाराष्ट्र आणि राजस्थान सारख्या 10 राज्यांमध्ये IOC, BPCL आणि HPCL पेक्षा 1 रुपये प्रति लिटर कमी दराने पेट्रोल आणि डिझेलची विक्री करत आहे.

दिल्लीतील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर सध्या पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT