All Wheel Drive SUVs Dainik Gomantak
अर्थविश्व

All Wheel Drive SUVs: कमी किमतीत SUVs खरेदी करायची असेल तर 'या' कार सर्च करून पाहा

दैनिक गोमन्तक

भारतीय बाजारपेठेत SUV कारचा ट्रेंड वाढल्यानंतर लोक आता 4WD किंवा AWD SUV ला अधिक पसंती देत ​​आहेत. परंतु अशा वाहनांची किंमतही खूप आहे. हे वैशिष्ट्य फॉर्च्युनर, फोर्ड एंडेव्हर आणि एमजी ग्लोस्टर सारख्या कारमध्ये उपलब्ध आहे. परंतु या सर्वांची किंमत 30 लाखांपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला तुमच्यासाठी ऑफ-रोडिंग कार हवी असेल म्हणजे 4-व्हील ड्राईव्ह SUV आणि तुमचे बजेट थोडे कमी असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही कारची माहिती घेऊन आलो आहोत, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात, चला तर मग पाहूया कोणत्या 4WD गाड्या आहेत.

* महिंद्रा थार (Mahindra Thar)

स्वदेशी ऑटोमोबाईल कंपनीने ऑफर केलेली ही देशातील सर्वात परवडणारी 4WD SUV आहे. ऑफ-रोडिंगसाठी खास बनवलेल्या या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 13.53 लाख ते 16.03 लाख रुपये आहे. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 2.0-लिटर पेट्रोल इंजिन (150 Bhp) आणि 2.2-लिटर डिझेल इंजिन (130 Bhp). या फोर-व्हील-ड्राइव्ह सिस्टमसह येणारी एसयूव्ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसच्या निवडीत येते.

* फोर्स गुरखा Force Gurkha

फोर्स गुरखा ही एक एनालॉग ऑफ-रोडिंग कार आहे. जी अॅनालॉग 4X4 सह येते.SUV मध्ये 2.5 लिटर इंजिन आहे. जे 90 Bhp पॉवर जनरेट करते. मॅन्युअल-लॉकिंग मेकॅनिकल फ्रंट आणि रियर डिफरेंशियल फीचरसह भारतात उपलब्ध असलेली ही एकमेव कार आहे. या कारचा एकच प्रकार बाजारात उपलब्ध आहे. त्याच्या कारची किंमत 14.49 लाख रुपये आहे.

* 2022 महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N)

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एन (Mahindra Scorpio-N) बाजारात येण्याआधीपासूनच चर्चेचा विषय आहे.महिंद्राने या एसयूव्हीला फीचर लोडेड एसयूव्ही म्हणून डिझाइन केले आहे. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे तर तिच्या सर्वात स्वस्त 4X4 प्रकाराची (Scorpio-NZ4 डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) एक्स-शोरूम किंमत 16.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याच्या टॉप एंड व्हेरियंटची एक्स-शोरूम (Z8 L) 23.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT