Gautam Adani  Dainik Gomantak
अर्थविश्व

Adani Group: अदानी समूहाने फेडले 4096 कोटींचे कर्ज, गुंतवणूकदारांचा वाढणार विश्वास!

Gautam Adani: अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

Manish Jadhav

Adani Group: अदानी समूहाच्या गुंतवणूकदारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अदानी समूहाने $500 दशलक्ष (रु. 4096 कोटी) च्या ब्रिज लोनची परतफेड केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेणाऱ्या एका व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हा ग्रुप गुंतवणूकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. हे लोन पेमेंट त्याच लिंकवर जोडलेले आहे.

ब्लूमबर्गने एका जवळच्या व्यक्तीचा हवाला देत आपल्या अहवालात म्हटले आहे की, कंपनीने हे पैसे मंगळवारीच ट्रान्सफर केले आहेत.

मात्र, अद्यापही संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाला मोठा फटका बसला होता.

सर्व सूचिबद्ध कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. पण गेले काही दिवस अदानी समूहासाठी कठीण होते. त्यामुळे गुंतवणुकदारांचा (Investors) विश्वास समूहाच्या सूचिबद्ध कंपन्यांकडे पुन्हा वाढला आहे.

समूहाने या आठवड्यात 7374 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, कंपनीने या आठवड्यात सांगितले होते की, त्यांनी 7374 कोटी ($ 901.16 दशलक्ष) कर्जाची परतफेड केली आहे.

कंपनी आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी सातत्याने काम करत आहे. एकीकडे कर्ज भरल्यामुळे कर्ज कमी होत आहे. दुसरीकडे, शेअर बाजारात कंपन्यांची कामगिरी चांगली होत आहे.

गेल्या आठवड्यात एनआरआय राजीव जैन यांनी 4 कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले होते

गेल्या आठवड्यात अमेरिकन फर्म GQG पार्टनर्सने अदानी ग्रुपच्या चार कंपन्यांमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, फर्म अदानी समूहाच्या (Adani Group) कंपन्यांमध्ये अधिक पैसे गुंतवणूक विचार करत होती. जेव्हापासून GQG फर्मने अदानी ग्रुपमध्ये पैसे गुंतवले आहेत, तेव्हापासून त्यांना फक्त फायदा झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT