Adani Group साठी आनंदाची बातमी, 'या' बदलामुळे गुंतवणूकदारांचा वाढणार विश्वास!

Adani-Hindenburg Saga: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Gautam Adani
Gautam AdaniDainik Gomantak
Published on
Updated on

Adani-Hindenburg Saga: हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाला सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण आता बऱ्याच दिवसांनी या ग्रुपसाठी एक मोठी बातमी येत आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (NSE) समूहाला ही आनंदाची बातमी दिली आहे.

नवीन अपडेटनुसार, समूहाच्या अदानी विल्मर आणि अदानी पॉवर या दोन कंपन्यांचे शेअर्स लवकरच NSE च्या विविध निर्देशांकांचा भाग बनवले जातील. त्यामुळे अदानी समूहाकडे (Adani Group) लोकांचा विश्वास वाढण्याची अपेक्षा असून इतर शेअर्समध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

Gautam Adani
Adani Group: पंतप्रधान नरेंद्र मोदींशी मैत्री करून अदानींनी गोव्यासह देशभरातील लुटल्या बँका

दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी ग्रुपवरील गुंतवणूकदारांचा (Investors) विश्वास डळमळीत झाला आहे. 31 मार्च 2023 पासून निर्देशांकात अदानी विल्मर आणि अदानी पॉवर यांचा समावेश होण्याची शक्यता आहे, असे NSE कडून सांगण्यात आले. त्यासाठी तयारीही करण्यात आली आहे.

दुसरीकडे, अदानी विल्मारला निफ्टी नेक्स्ट 50 आणि निफ्टी 100 मध्ये स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याशिवाय, निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी लार्ज मिडकॅप 250, निफ्टी मिडकॅप 150 आणि निफ्टी मिड-स्मॉलकॅप 400 मध्ये अदानी पॉवरचाही समावेश केला जाईल.

Gautam Adani
Adani Group: हिंडेनबर्ग वादाच्या पार्श्वभूमीवर अदानींच्या 6 कंपन्यांचे विलीनीकरण, NCLT ची मंजूरी

या कंपन्याही सहभागी होणार आहेत

अदानी विल्मार व्यतिरिक्त, कॅनरा बँक, एबीबी इंडिया, पेज इंडस्ट्रीज, बंधन बँक, वरुण बेव्हरेजेस, वन 97 कम्युनिकेशन, बायोकॉन, ग्लँड फार्मा आणि एमफेसिसचे शेअर्स देखील निफ्टी नेक्स्ट 50 निर्देशांकात समाविष्ट केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com