Countries with cheapest manufacturing costs. Dainik Gomantak
अर्थविश्व

चीनला पछाडत 'या' क्षेत्रात भारताची बाजी, मिळवले अव्वल स्थान

India: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, या क्षेत्रात भारत अव्वल आहे. यानंतर चीन दुसऱ्या तर व्हिएतनाम तिसऱ्या क्रमांकावर आहे. थायलंड चौथ्या, फिलिपाइन्स पाचव्या क्रमांकावर आहे.

Ashutosh Masgaunde

According to World of Statistics, India is at the top among the countries with cheapest manufacturing costs:

जगातील सर्वात स्वस्त उत्पादन खर्च असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आपला शेजारी देश चीनला मागे टाकत भारताने हे स्थान मिळवले आहे.

संपूर्ण जगात सर्वात स्वस्त उत्पादन खर्चामुळे अमेरिकेसह जगभरातील देश आता चीनपेक्षा भारताला प्राधान्य देत आहेत.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, सर्वात स्वस्त उत्पादन खर्च असलेल्या देशांमध्ये भारत अव्वल आहे. यानंतर चीन दुसऱ्या तर व्हिएतनाम तिसऱ्या क्रमांकावर आहे. थायलंड चौथ्या, फिलिपाइन्स पाचव्या, बांगलादेश सहाव्या, इंडोनेशिया सातव्या, कंबोडिया आठव्या, मलेशिया नवव्या आणि श्रीलंका दहाव्या क्रमांकावर आहे.

या यादीत पुढे घाना, केनिया, मेक्सिको, उझबेकिस्तान, कोलंबिया, दक्षिण आफ्रिका, कझाकिस्तान, ट्युनिशिया, चिली, अल्जेरिया, तुर्की आणि उरुग्वे यांचा क्रमांक लागतो. या यादीत जगभरातील 50 देशांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताला पसंती

भारतातील स्वस्त उत्पादन खर्चामुळे जगभरातील मोठ्या कंपन्या आपले कारखाने चीनमधून भारतात किंवा इतर देशांमध्ये हलवत आहेत.

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की चीनमधून अमेरिकन आयातीत मोठी घट झाली आहे, तर भारतातून आयात अनेक पटींनी वाढली आहे.

निर्यात वाढली

बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अभ्यासात असे समोर आले आहे की, 2018 ते 2022 दरम्यान अमेरिकेकडून (USA) चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे.

त्याचवेळी, भारतातून अमेरिकेत आयात (Import) करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये 44 टक्के वाढ दिसून आली आहे. याशिवाय, मेक्सिकोमधून 18% आणि दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेकडून 65% वाढ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ZP Election 2025: सावर्डेत मोहन, आतिष यांच्यात थेट लढत; आरजी, काँग्रेस रिंगणात, आमदार गणेश गावकर यांची प्रतिष्ठा पणाला

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SCROLL FOR NEXT