Aadhaar Card|Blue Aadhar Card Dainik Gomantak
अर्थविश्व

Aadhaar Card: घरबसल्या मिळवा ब्लू आधार कार्ड; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Blue Aadhar Card: वर्षांखालील मुलांसाठी विशेष आधार कार्ड आहे. या आधार कार्डला ब्लू आधार कार्ड म्हणतात.

Ashutosh Masgaunde

Step by Step Process For Childrens Blue Aadhar Card: आधार कार्ड देशभरातील नागरिकांचे ओळखपत्र म्हणून काम करते. देशातील सर्व नागरिकांकडे त्यांच्या ओळखीचा पुराव म्हणून आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

देशात अनेक प्रकारची आधार कार्डे आहेत. यापैकी एक ब्लू आधार कार्ड देखील आहे. अनेकांना या आधार कार्डबद्दल माहिती नाही.

ब्लू आधार कार्ड

5 वर्षांखालील मुलांसाठी बनवलेल्या आधार कार्डचा रंग निळा आहे. म्हणून याला ब्लू कींवा बाल आधार कार्ड असेही म्हणतात.

या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक आवश्यक नाही. हे आधार कार्ड तुम्ही घरबसल्याही बनवू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आता ही प्रक्रिया सुलभ केली आहे.

यापूर्वी हे आधार कार्ड काढण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक होता. आता हे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्राशिवायही बनवता येणार आहे. तुम्हाला घरी बसून जे हवे असेल ते तुम्ही या आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.

ब्लू आधार कार्डसाठी असा करा अर्ज

  • सर्व प्रथम, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.UIDAI.gov.in वर जावे लागेल.

  • यानंतर तुम्हाला आधार कार्डच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • येथे एक नवीन विंडो उघडेल. तुम्हाला आता मुलाचे नाव, पालकाचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी असे विविध तपशील टाकावे लागतील.

  • यानंतर, तुम्हाला बाळाचे जन्म ठिकाण, संपूर्ण पत्ता, जिल्हा आणि राज्य यासारखी उर्वरित माहिती भरावी लागेल.

  • तुम्ही टाकलेली माहिती पुन्हा एकदा वाचा, आता तुम्ही फॉर्म सबमिट करा.

  • ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला UIDAI केंद्राला भेट द्यावी लागेल.

  • तुम्ही UIDAI केंद्राला भेट देण्यासाठी अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंटचा पर्याय निवडून अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज, बाबूश यांच्‍या मनात आहे तरी काय?

रस्ता चुकला, गाडी चिखलात रुतली; मनालीतून गोव्याला येताना रशियन महिलेवर आले संकट, पोलिस, स्थानिक धावले मदतीला

Goa Live News: पुढील सहा महिन्यांत महामंडळाचे उत्पन्न वाढणार

Kadamba Bus: "दारू पिऊन बस चालवल्यास घरचा रस्ता दाखवणार" KTCचा आक्रमक पवित्रा; तुयेकरांनी दिले कठोर निर्देश

India vs Pakistan: Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? सामना रद्द करण्याच्या याचिकेवर Supreme Courtनं दिला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT