8th Pay Commission latest update for central government employees highlighting salary, bonus and gratuity changes Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission Latest Update: पगारवाढच नाही, तर बोनस आणि ग्रॅच्युइटीमध्येही होणार मोठा फेरबदल! 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात

8th Pay Commission Latest News 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भत्त्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. भत्त्यांची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत बनवण्याचे आदेश सरकारने दिले.

Manish Jadhav

8th Pay Commission Latest News 2026: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली. 8व्या वेतन आयोगाची स्थापना होऊन आता आठ महिने पूर्ण झाले असून, आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आता केवळ दहा महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. अहवाल सादर करण्याची मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतसे आयोगाने आपल्या कामाचा वेग कमालीचा वाढवला आहे.

नुकतीच आयोगाने ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगालमध्ये विविध कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्या ऐकून घेण्यात आल्या. सध्या सरकारी वर्तुळात फिटमेंट फॅक्टरबाबत सर्वात जास्त चर्चा सुरु आहे, ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित केले जाते. परंतु, यावेळचा मुद्दा केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नसून, सरकारने आयोगाला इतरही अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भत्त्यांची पुनर्रचना केली जाणार आहे. भत्त्यांची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत बनवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, ज्यामुळे भत्त्यांमधील रकमेसोबतच त्यांचे नियमही बदलू शकतात. याशिवाय, आता जुन्या पद्धतीने बोनस न मिळता कामगिरीवर आधारित बोनस देण्याची नवीन चौकट तयार केली जात आहे. म्हणजेच, जो कर्मचारी जितके चांगले काम करेल, त्याला त्या प्रमाणात अधिक बोनस किंवा बक्षीस मिळेल.

तसेच, निवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीच्या नियमांचेही विश्लेषण केले जात आहे. ज्या कर्मचाऱ्यांना सध्या राष्ट्रीय पेन्शन प्रणालीअंतर्गत (NPS) पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा पूर्ण लाभ मिळत नाही, त्यांच्यासाठी नवीन नियम बनवले जाऊ शकतात.

या वेळच्या वेतन आयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सरकारी नोकऱ्यांमधील वेतन आणि कामाची परिस्थिती यांची तुलना थेट खाजगी क्षेत्राशी (Private Sector) केली जाणार आहे. खाजगी क्षेत्रातील चांगल्या टॅलेंटला सरकारी नोकऱ्यांकडे आकर्षित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या या आयोगाला 18 महिन्यांत आपले काम पूर्ण करायचे आहे. मात्र, अंतिम अहवालापूर्वी आयोग एक अंतरिम (Interim) अहवाल सादर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs SA: कॅन्सरवर मात करुन 10 वर्षांनंतर संघात परतला, पण 33 चेंडू खेळूनही खातं उघडता आलं नाही; ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर नकोसा रेकॉर्ड

Jeffrey Archer: संसद ते तुरुंग अन् तिथून 'बेस्टसेलर' लेखकापर्यंत! जेफ्री आर्चर यांचा थक्क करणारा प्रवास

Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या ‘नावी’ पिल्लई यांना मानाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; न्यायासाठीचा संघर्ष ठरला यशस्वी

Arjun Tendulkar Injury: अर्जुन तेंडुलकरला दुखापतीचा फटका; गोव्याच्या रणजी सलामीच्या सामन्याला मुकणार!

Weightlifting Coach Recruitment: वेटलिफ्टिंग प्रशिक्षक निवडीला पुन्हा 'ब्रेक'; सर्वोच्च न्यायालयाकडून प्रकरण फेरसुनावणीसाठी परत

SCROLL FOR NEXT