8th Pay Commission Dainik Gomantak
अर्थविश्व

8th Pay Commission: पगारवाढीचा 'सुपर धमाका'! रिटायरमेंट फंड आणि एरियरबाबत मोठी अपडेट; बेसिक सॅलरी किती वाढणार?

Salary Increment Analysis 8th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली.

Manish Jadhav

Salary Increment Analysis 8th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता नवीन वळण मिळाले. समोर आलेल्या नवीन कॅल्क्युलेशननुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल होऊ शकतो.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा आता एका रोमांचक टप्प्यावर पोहोचली. ताज्या रिपोर्ट्स आणि डेटा विश्लेषणावरुन असे दिसून येते की, हा नवीन वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ पाहायला मिळू शकते. तज्ज्ञांच्या मते, यावेळचा 'फिटमेंट फॅक्टर' (Fitment Factor) 1.89 राहण्याचा अंदाज आहे. 7 व्या वेतन आयोगाच्या वेळी हा फॅक्टर 2.57 होता, परंतु सरकारी तिजोरीवर येणारा ताण आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता 1.89 हा आकडा अधिक वास्तववादी आणि संतुलित मानला जात आहे. याच फॅक्टरच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित केले जाईल.

या नवीन गणितानुसार, जर 1.89 चा फिटमेंट फॅक्टर लागू झाला, तर लेव्हल-1 च्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन, जे सध्या 18,000 रुपये आहे, ते थेट 34,000 रुपयांच्या घरात पोहोचेल. म्हणजेच मूळ वेतनातच तब्बल 16,000 रुपयांची वाढ होणार आहे. नियमानुसार, जेव्हा नवीन वेतन आयोग येतो, तेव्हा सध्याचा महागाई भत्ता (DA), जो आता 60 टक्क्यांच्या वर गेला, तो मूळ वेतनात विलीन केला जातो आणि नवीन डीए शून्यापासून सुरु होतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात मोठी सुधारणा होईल.

जरी सरकारने अद्याप यावर कोणतीही अधिकृत मोहोर उमटवली नसली, तरी हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानला जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रक्रियेला कितीही वेळ लागला तरी, कर्मचाऱ्यांना (Employees) 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी (Arrear) व्याजासह मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. ही एकरकमी मिळणारी मोठी रक्कम कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील गुंतवणुकीसाठी एक मोठी संधी ठरणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, 2026 हे वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचे आणि मजबुतीचे वर्ष ठरेल यात शंका नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT