8th Pay Commission Implementation Delay 2028: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली. ड्यूश बँक रिसर्चच्या अहवालानुसार, जर आठवा वेतन आयोग लागू करण्यास 2028 पर्यंत उशीर झाला, तर सरकारला तात्पुरता दिलासा मिळेल, पण थकबाकीमुळे (एरियर) भविष्यात तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडू शकतो.
अहावालानुसार, आठव्या वेतन आयोगामुळे सरकारी खर्चात किमान 3 लाख कोटी रुपयांची वाढ होऊ शकते. याचा परिणाम आर्थिक वर्ष 2028 मधील राजकोषीय नियोजनावर होण्याची शक्यता असून राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पगारवाढीसोबतच कच्च्या तेलाचे चढे दर, अनुदानावरील (Subsidy) वाढता खर्च आणि आरबीआयकडून मिळणाऱ्या लाभांशात घट झाल्यास सरकारी तिजोरीवरील ताण आणखी वाढू शकतो. विशेष म्हणजे, हा अंदाजित 3 लाख कोटींचा खर्च आर्थिक वर्ष 2027 मधील आरबीआयच्या 2.9 लाख कोटींच्या अपेक्षित लाभांशापेक्षाही थोडा जास्त आहे.
जर पगारवाढ मागील तारखेपासून लागू केली गेली, तर विलंबामुळे थकबाकीचा कालावधी वाढेल. त्यामुळे जेव्हा हा आयोग प्रत्यक्षात लागू होईल, तेव्हा सरकारला एकत्रित मोठी रक्कम द्यावी लागेल. म्हणूनच ठरलेल्या वेळेतच वेतन सुधारणा लागू करावी, असे या अहवालातून सूचित केले आहे. केंद्र सरकार 2027 पासून या शिफारशी लागू करण्याचा विचार करु शकते, मात्र अंतिम तारीख आणि थकबाकी देण्याची पद्धत सर्वस्वी सरकारच्या निर्णयावर अवलंबून असेल.
दुसरीकडे, कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा आल्याने बाजारात खरेदी आणि मागणी वाढून देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते. आगामी 2027-28च्या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त सांभाळत वेतन आयोगाचा खर्च कसा बसवायचा, हे सरकारपुढील मोठे आव्हान असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.