Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: आनंदाची बातमी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 18 महिन्यांची थकबाकी, होळीनंतर...!

DA: 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित 18 महिन्यांच्या प्रलंबित DA थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते.

Manish Jadhav

7th Pay Commission: सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या डीए थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचवेळी, 18 महिन्यांच्या थकबाकीवर सरकारकडून निर्णय घेतला जाऊ शकतो, असे वृत्त आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित 18 महिन्यांच्या प्रलंबित DA थकबाकीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते.

वेतन आयोग

वास्तविक, या कर्मचाऱ्यांना (Employees) यंदा होळीनंतर लगेचच आनंदाची बातमी मिळू शकते. कर्मचारी आणि लाखो पेन्शनधारक होळीनंतर महामारीच्या काळात थकलेली 18 महिन्यांची डीएची थकबाकी सरकार भेट देऊ शकते, याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील थकीत महागाई भत्ता जाहीर करावा, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी सातत्याने करत आहेत.

सातवा वेतन आयोग

अलीकडेच, जेसीएम सचिवांनी कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये त्यांनी थकबाकीवर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला आणि महागाई (Inflation) भत्ता हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, यावर निर्णय घेण्याची मागणी केली.

7व्या वेतन आयोगांतर्गत डीए थकबाकी मिळण्याची त्यांची मागणी सरकारने मान्य केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात लक्षणीय वाढ होईल. यामुळेच कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी सातत्याने दबाव टाकत आहेत.

वेतन आयोग

कोविड-19 महामारीच्या काळात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. या दरम्यान केंद्र सरकारने कोविड-19 दरम्यान केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वर बंदी घातली होती. मात्र, कोविड-19 महामारी संपल्यापासून कर्मचारी या रकमेची मागणी करत आहेत. अनेक दिवसांपासून सरकारकडे निधी देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT