Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट, DA-DR मध्ये पुन्हा बंपर वाढ

7th Pay Commission Latest Update: केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आहेत.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA- DR Hike: केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारही आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करत आहेत. यूपी सरकारनंतर आता हरियाणा सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. हरियाणा सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के केला आहे. हा वाढीव भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू होईल. म्हणजेच या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3 महिन्यांच्या थकबाकीसह येणार आहे. आता जाणून घेऊया कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती पैसे वाढणार आहेत.

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे (Employees) मूळ वेतन रु 56,900

2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना

4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2276/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 2276 X12 = रु. 27,312

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई (Inflation) भत्ता (38%) रु.6840/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.720/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 720 X12 = रु 8640

विशेष म्हणजे, केंद्र सरकारने (Central Government) नुकताच कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरुन 38 टक्के केला आहे. त्यानंतर, उत्तर प्रदेश सरकारनेही राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी भेट देत महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात 4% वाढ केली. ही वाढही 1 जुलैपासून लागू झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटले की, '2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 6,908 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'

दुसरीकडे, झारखंड सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. ही वाढ 1 जुलै 2022 पासून लागू होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT