Money DaINIK Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका, आता महागाई भत्त्यावर भरावा लागणार कर

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. DA बाबत नवीन अपडेट आली आहे. नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. DA बाबत नवीन अपडेट आली आहे. नवीन वर्षात महागाई भत्त्यात वाढ होणार आहे, पण नव्या पद्धतीने. इतकेच नाही तर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांनाही डीए वाढीवर कर भरावा लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने महागाई भत्त्यासंदर्भात गणनाचे सूत्र बदलले आहे. नवीन अपडेट्स जाणून घेऊया...

काय बदलले आहे ते जाणून घ्या

यापूर्वी, 2016 मध्ये कामगार मंत्रालयाने डीए वाढीचे मूळ वर्ष बदलले होते. विभागाकडून वेतन दर निर्देशांक (WRI) ची नवीन सीरीज प्रसिद्ध करण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता 7व्या वेतन आयोगात (7th Pay Commission), आधार वर्ष 2016 = 100 असलेली नवीन सीरीज मूळ वर्ष 1963-65 च्या जुन्या सीरीजची जागा घेईल. म्हणजेच सूत्रात बदल झाला आहे.

आता हिशोब कसा होणार?

वास्तविक, सातव्या वेतन आयोगाअंतर्गत, एकूण महागाई भत्त्याची गणना सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला मूळ वेतनासह गुणाकार करुन केली जाते. त्यानुसार, 12% च्या सध्याच्या दराच्या आधारावर, जर तुमचा मूळ पगार 20 हजार असेल, तर DA (20,000 x12)/100 असेल. महागाई भत्त्याची टक्केवारी = गेल्या 12 महिन्यांची CPI ची सरासरी-115.76. आता या रकमेला 115.76 ने भागल्यास मिळालेल्या निष्कर्षाला 100 ने गुणाकार केला जाईल. आणि मग हा तुमचा महागाई (Inflation) भत्ता असेल. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत 38% महागाई भत्ता आहे.

डीए वाढीवर कर भरावा लागेल

विशेष म्हणजे, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यावर कर भरावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये महागाई भत्त्याची सविस्तर माहिती द्यावी लागेल. त्यानुसार, तुम्हाला महागाई भत्त्यावर (DA) कर भरावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT