Money  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM मोदी करणार मोठी घोषणा!

7th Pay Commission DA Hike: जर तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल.

Manish Jadhav

7th Pay Commission DA Hike: जर तुम्ही स्वतः केंद्र सरकारचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. शुक्रवारी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 65 लाख कर्मचारी आणि 50 लाख पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याबाबत सरकारकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते. शोभा करंदलाजे म्हणाल्या की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत उपलब्ध मोफत राशनचा कालावधी आणखी वाढवला जाऊ शकतो.

कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन वर्षाची भेट असेल

मोदी मंत्रिमंडळाकडून 4 टक्के महागाई भत्त्यात वाढ करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारकडून ही घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांसाठी ही नववर्षाची भेट ठरणार आहे. AICPI निर्देशांकाची ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. ऑक्टोबरसाठी AICPI निर्देशांक सप्टेंबरच्या तुलनेत 1.2 अंकांनी वाढला असून 132.5 च्या पातळीवर पोहोचला आहे. सप्टेंबरमध्ये तो 131.3 टक्के होता.

डीए 42 टक्के वाढणार!

डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास तो 42 टक्के होईल. सप्टेंबरमधील महागाई भत्ता वाढीच्या आधारे, तो सध्या 38 टक्के आहे. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगली वाढ होणार आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत (7th Pay Commission) सरकारकडून (Government) दरवर्षी दोनदा डीएमध्ये वाढ केली जाते. जानेवारी 2022 आणि जुलै 2022 मध्ये एकूण 7 टक्के डीए वाढीची घोषणा करण्यात आली.

डेटा कोण जारी करतो?

AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई (Inflation) भत्त्यात किती वाढ होईल हे ठरवले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रे आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT