7th Pay Commission Update  Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बल्ले-बल्ले, सरकारने केली DA वाढवण्याची घोषणा

DA Hike: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्याचा महागाई भत्ता 34 टक्के आहे, तो आता 4 टक्क्यांनी वाढवून 38 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट फायदा विद्यमान 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

दरम्यान, 1 जुलै 2022 पासून सरकारकडून डीएमध्ये वाढ लागू होईल. यापूर्वी मार्च 2022 मध्ये सरकारने जानेवारीपासून डीए (Dearness Allowance) वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Employees) डीए 31 टक्क्यांवरुन 34 टक्के करण्यात आला होता. आता ते 38 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या पगारात दोन महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार आहे.

दुसरीकडे, केंद्र सरकार (Central Government) AICPI-IW (All India Consumer Price Index-Industrial Worker) इंडेक्सचा डेटा लाखो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीचा आधार मानते. पहिल्या सहामाहीतील AICPI-IW डेटाच्या आधारे जुलैचा DA जाहीर करण्यात आला आहे. जूनमध्ये निर्देशांक 129.2 पर्यंत वाढल्याने, डीए 4 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा मार्ग मोकळा झाला.

मूळ पगार किती वाढेल

1 जुलैपासून महागाई (Inflation) भत्त्यात 4 टक्के वाढ लागू होणार आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सरकारच्या वतीने भरणा केल्यास कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. डीए 38 टक्के असल्याने पगारात चांगली वाढ होईल. 4 टक्के DA सह किमान आणि कमाल मूळ वेतन किती वाढेल ते पाहूया?

कमाल मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900

2. नवीन महागाई भत्ता (38%) रुपये 21,622/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.19,346/महिना

4. महागाई भत्त्यात 21,622-19,346 ने किती वाढ झाली = रु 2260/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 2260 X12 = रु. 27,120

किमान मूळ पगाराची गणना

1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,000

2. नवीन महागाई भत्ता (38%) रु.6840/महिना

3. आतापर्यंत महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना

4. किती महागाई भत्ता वाढला 6840-6120 = रु.1080/महिना

5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8640

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

Baina Theft: मध्यरात्री 7 दरोडेखोर घुसले, कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; कपाट फोडून रोकड-दागिने लंपास; वाचा घटनाक्रम..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता, पैशांचे नियोजन करण्यासाठी उत्तम दिवस; 'या' राशीसाठी आजच दिवस फायद्याचा!

Money Laundering Case: 'अल फलाह युनिव्हर्सिटी'च्या संस्थापकाला ठोकल्या बेड्या, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; लाखोंच्या कॅशसह दस्तऐवज जप्त

IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

SCROLL FOR NEXT