Money Dainik Gomantak
अर्थविश्व

7th Pay Commission: नवीन वर्षापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, DA मध्ये केली तब्बल इतकी वाढ!

DA Hike News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा लाभ दिला आहे.

दैनिक गोमन्तक

DA Hike News: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षापूर्वीच सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा लाभ दिला आहे. खरे तर, मेघालय सरकारने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात (Dearness Allowance) 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यात ही वाढ जुलै 2022 पासून लागू होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ

सरकारच्या या घोषणेनंतर मेघालय (Meghalaya) कर्मचाऱ्यांचा डीए जुलै 2022 पासून 28 टक्क्यांवरुन 32 टक्के झाला आहे. वास्तविक, यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली होती. आता 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांच्या खात्यात 38 टक्के दराने डीए येऊ लागला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला

विशेष म्हणजे, याआधी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या (Employees) महागाई भत्त्यातही वाढ केली होती. एवढेच नाही तर आतापर्यंत आलेले AICPI चे आकडे पाहता नवीन वर्षात म्हणजेच 2023 च्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA वाढण्याची शक्यता आहे.

तसेच, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 38 टक्के महागाई भत्ता मिळतो. केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारांनीही महागाई भत्त्यात वाढ केली आहे. यामध्ये झारखंड, छत्तीसगड, हरियाणा, यूपी, कर्नाटक, पंजाब, आसाम इ. आता मेघालय सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे, सरकारच्या या निर्णयानंतर राज्यातील लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव पगार आणि पेन्शनचा लाभ मिळणार आहे. यासोबतच येत्या वर्षात म्हणजेच, 2023 मध्येही कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव भत्त्याची रक्कम येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT